ETV Bharat / state

Kinwat Trader Murder : मरावे परी कीर्ती रुपी उरावे, व्यापारी श्रीकांत यांचे अवयव दान ; मृत्युनंतर मिळाले आठ जणांना जीवदान - श्रीकांत भुमन्ना कंचर्लावार अवयवदान

नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये जागेच्या वादावरून झालेल्या मारहाणीत एका व्यापाऱ्याचा मृत्यु झाला आहे. मृत्युनंतर त्यांच्या कुटूंबियांनी व्यापारी श्रीकांत (kinwat Trader Shrikant Bhumanna Kancharlawar) यांचे अवयव दान केले. त्यांचे किडनी, यकृत, फुफुसे दान केल्याने आठ जणांना जीवदान मिळाले (after death donat organ) आहे.

Shrikant Bhumanna Kancharlawar
श्रीकांत भुमन्ना कंचर्लावार
author img

By

Published : Dec 31, 2022, 8:52 AM IST

नांदेड : मेंदू मृत झाल्यानंतर जन्मदात्याच्या दुःखाने किंचितही खचून न जाता त्यांच्या पत्नी मुलगा व मुलीने वडिलाचे अवयव दान करण्यासाठी पुढे येत समाजासमोर एक सामाजिक कार्याचा नवा आदर्श ठेवला (kinwat Trader Shrikant Bhumanna Kancharlawar) आहे. मारहाणीत मरण पावलेल्या श्रीकांत कंचर्लावार या व्यापाऱ्याच्या कुटुंबाने घेतलेला हा निर्णय इतरांसाठी जीवनदान देणारा ठरला आहे. किनवट येथील प्रसिद्ध सराफा व्यापारी श्रीकांत भुमन्ना कंचर्लावार (४८) यांना १२ डिसेंबर रोजी मारहाणीत गंभीर दुखापत झाली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मेंदू २७ डिसेंबर रोजी मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर (after death donat organ) केले.

अवयवदानासाठी सहमती : दान हे वडिलोपार्जित असलेला ठेवा असल्याने कुटुंबीयांनी अवयवदानासाठी सहमती दर्शविली. पत्नी लता, मुलगा अक्षय आणि मुलगी समिक्षा यांना डॉक्टरांनी अवयवदानाद्वारे तुमच्या वडिलांचे पुनर्जन्म होईल, असे सांगताच त्यांनी ते मान्य केले. २ डोळे, २ किडनी, यकृत, फुफुसे दान करण्यात आले. कंचर्लावार कुटुंबावर मोठा आघात होऊनही त्यांनी अवयवदान करण्याचा घेतलेला निर्णय समाजापुढे आदर्श निर्माण करणारा आहे.

मरावे परी कीर्ती रुपी उरावे : तरुण वयात अचानक इहलोकीची यात्रा संपून निघून गेलेल्या श्रीकांत भुमन्ना कंचर्लावार यांनी मरावे परी कीर्ती रुपी उरावे, हा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. या अवयवदानामुळे ८ जणांना जीवनदान मिळाले आहे. या स्तुत्य कार्यासाठी कुटुंबीयांचा रुग्णालयातर्फे सत्कार करण्यात (Kancharlawar donat organ) आला.

जबर मारहाण : १२ डिसेंबर रोजी भोई गल्ली (किनवट) येथील संतोषकोल्हे यांच्या घरासमोर जागेच्या वादावरून विक्की कोल्हे, संतोष कोल्हे, विशाल कोल्हे यांनी मिळून बंडू कंचर्लावार व त्यांचे बंधू श्रीकांत कंचर्लावार आणि मुनीमाला यांना जबर मारहाण केली (Kinwat Trader Murder) होती. प्रकृती गंभीर असल्याने या दोघाभावंडाना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले होता. तर मृतदेह पोलीस ठाण्यात नेणार व्यापारी श्रीकांत कंचर्लावार यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक न झाल्यास मृतदेह पोलीस ठाण्यात आणला जाईल, असा इशारा निवेदनातून दिला होता. निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांना दिले होते. निवेदनावर किराणा व भुसार असोसिएशचे अध्यक्ष दिनकर चाडावार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजपाचे अशोक नेम्मानीवार, शिवराज चाडावार, व्यंकट भंडारवार, अखिल खान, अजय चाडावार, दीपक चाडावार, युसूफ खान, गजानन चाडावार, आशिष चाडावार, अमित चिन्नावार यांच्यासह शंभराहून अधिक व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या (Shrikant Bhumanna Kancharlawar) आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.