ETV Bharat / state

Accused Death in Jail : मुंबई एनआयएने पकडलेल्या आरोपीचा नांदेडच्या तुरुंगात मृत्यू!

author img

By

Published : Dec 11, 2021, 9:54 PM IST

मागील महिन्यात एनआयए शाखा मुंबईने ( NIA drug trafficking case ) नांदेडमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण चौकाजवळ एका व्यापारी संकुलात अंमलीपदार्थ या व्याख्येत येणारे अफुबोंडे ( डोडे ) आणि अफीम पकडली होती. त्यात एकूण 4 जणांना अटक झाली होती. या अटकेतील एका आरोपीचा मृत्यू ( accused death in Nanded jail ) झाला आहे.

जितेंद्रसिंघ परगणसिंघ भुल्लर
जितेंद्रसिंघ परगणसिंघ भुल्लर

नांदेड - एनआयएने पकडलेल्या अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार ( NIA drug trafficking case ) अटकेत असलेल्या आरोपीचा तुरुंगात मृत्यू ( accused death in Nanded jail ) झाला आहे. त्याबाबत वजिराबाद पोलीसांनी ( Wazirabad Police Nanded ) आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. जितेंद्रसिंघ परगणसिंघ भुल्लर असे मृत आरोपीचे नाव आहे.

मागील महिन्यात एनआयए शाखा मुंबईने नांदेडमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण चौकाजवळ एका व्यापारी संकुलात अमलीपदार्थ या व्याख्येत येणारे अफुबोंडे ( डोडे ) आणि अफीम पकडली होती. त्यात एकूण 4 जणांना अटक झाली होती.

हेही वाचा-Illegal Stay In Mumbai : मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी महिलेसह अतिरिक्त पोलीस महासंचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

२६ नोव्हेंबरला तुरुंगात पाठवले होते...!

तीन जणांना न्यायालयाने 26 नोव्हेंबर रोजी तुरूंगात पाठवले होते. या तिघांमध्ये एकाचे नाव जितेंद्रसिंघ परगणसिंघ भुल्लर असे होते. जितेंद्रसिंघ हा कैदी नांदेडच्या तुरूंगात राहत होता. 9 डिसेंबर रोजी दुपारी त्याच्या सोबतच्या इतर कैद्यांनी त्याला आवाज दिला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे इतर कैद्यांनी तेथील सुरक्षा रक्षकांना बोलावले. जितेंद्रसिंघला उपचारासाठी सरकारी रुग्णालय विष्णुपूरी ( gov Vishnupuri Hospital ) येथे दाखल केले. पण उपचारादरम्यान रात्री 10 वाजता जितेंद्रसिंघचा मृत्यू झाला.

हेही वाचा-Nashik Studio Robbery : नाशकात मंदार गर्गे आर्ट स्टुडिओवर सिनेस्टाईल दरोडा, लाखोंचे साहित्य केले लंपास

वजीराबाद पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद...!

प्रभारी कारागृह अधिक्षक माधव कामाजी खैरगे यांनी दिलेल्या अर्जानुसारजितेंद्रसिंघ भुल्लर याचा इन्क्वेस्ट पंचनामा , शवविच्छेदन करून वजिराबाद पोलीसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद करीत आहेत.

हेही वाचा-Fake Payment APP : सोने खरेदीत 25 सराफांना गंडा घालणाऱ्याला बेड्या, फसवणुकीच्या पद्धतीने पोलिसही चक्रावले!

महिनाभरापासून हर्सूल कारागृहात बंदिस्त असलेल्या 47 वर्षीय कैद्याचा 4 सप्टेंबर 2021 मध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सचिन रमेश पाटील असे कैद्याचे नाव असून तो एमपीडीएमधील आरोपी होता. तो महिनाभरापासून हर्सूल कारागृहात होता. मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्याची प्रकृती अचानक बिघडली. कारागृहातील डॉक्टरांनी त्याच्यावर औषधोपचार केले. मात्र त्याचा मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.