ETV Bharat / entertainment

रिया सिंघानं जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया 2024'चा मुकूट; उर्वशी रौतेलानं केलं कौतुक - Miss Universe India 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Updated : 59 minutes ago

Miss Universe India 2024 Rhea Singha : राजस्थानची राजधानी जयपूर येथे झालेल्या 'मिस युनिव्हर्स इंडिया 2024' स्पर्धेत रिया सिंघानं मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला. या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Rhea Singha crowned Miss Universe India 2024 in Jaipur
रिया सिंघानं जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया 2024'चा मुकूट (ANI)

जयपूर Miss Universe India 2024 Rhea Singha : राजस्थानची राजधानी जयपूर येथे झालेल्या 'मिस युनिव्हर्स इंडिया 2024' या स्पर्धेत रिया सिंघ ही मिस युनिव्हर्स ठरली आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेलानं रियाला विजेतेपदाचा मुकुट घातला. यावेळी उर्वशी रौतेलानं रियाला शुभेच्छा देत तिचं कौतुक केलं.

काय म्हणाली रिया सिंघा? : 'मिस युनिव्हर्स इंडिया 2024' स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सौंदर्यवती रिया सिंघा म्हणाली, "आज मी 'मिस युनिव्हर्स इंडिया 2024'चे विजेतेपद जिंकले. यासाठी खरंच मी सर्वांची खूप आभारी आहे. हे यश गाठण्यासाठी मी खूप मेहनत घेतलीय. या स्तरावर पोहोचल्यानंतर मी स्वतःला या मुकुटासाठी पात्र समजू शकते." तसंच यापूर्वीच्या विजेत्यांकडून मी खूप प्रेरित असल्याचंही रियानं सांगितलं.

उर्वशी रौतेलाची प्रतिक्रिया : यावेळी बोलत असताना बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स इंडिया 2015 उर्वशी रौतेला म्हणाली, "सर्व मुलींना जे वाटतंय ते मलाही वाटतंय. विजेती खरंच अप्रतिम आहे." तसंच मिस युनिव्हर्सच्या जागतिक व्यासपीठावर ती आपल्या देशाचं उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वासही उर्वशीनं यावेळी व्यक्त केला. पुढं ती म्हणाली की,"मला आशा आहे की, यावर्षी पुन्हा एकदा भारताला मिस युनिव्हर्सचा मुकूट मिळेल. सर्व मुली खूप मेहनती, समर्पित आणि खूप सुंदर आहेत."

  • दरम्यान, शोच्या लास्ट राऊंडवेळी पहिल्या 10 स्पर्धकांनी अंतिम प्रश्नोत्तर फेरीत त्यांच्या बुद्धिमत्तेनं आणि आत्मविश्वासानं परीक्षकांची मनं जिंकली. अखेर रिया सिंघा हिला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा मुकुट प्रदान करण्यात आला. भारताला एक नवीन आंतरराष्ट्रीय स्टार मिळाली.

हेही वाचा -

  1. मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024चा 'ताज' ध्रुवी पटेलनं जिंकला, व्यक्त केल्या भावना... - DHRUVI PATEL
  2. Krystyna Pyszkova : मिस वर्ल्ड क्रिस्टिना पिस्कोव्हाला 'या'मुळे आवडतो शाहरुख खान
  3. मिस वर्ल्ड 2024 मध्ये नीता अंबानींची चर्चा, कारण काय?

Last Updated : 59 minutes ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.