न्यूयॉर्क PM Modis US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यूयॉर्क दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी "हम आग की तरह जलाने वाले नही, सूरज की तरह रोशनी देने वाले है." पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानं उपस्थित नागरिकांनी मोठा जल्लोष केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलीच फटकेजाबी केली. दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्क शहरात आयोजित परिषदेत अनेक राष्ट्राध्यक्ष आणि इतर देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा केली. यात नेपाळचे पंतप्रधान के पी सरमा ओली, कुवैतचे प्रिंसेस शेख सबाह खालेद अल-हमद अल-सबाह अल-सबाह, पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास आदींसह Quad Summit मध्ये सहभागी झालेल्या नेत्यांशी त्यांनी चर्चा केली.
Prime Minister Narendra Modi tweets " thank you new york. these are glimpses from the memorable community programme. grateful to all those who joined" pic.twitter.com/4q1K8pwzy5
— ANI (@ANI) September 23, 2024
PM Narendra Modi tweets, " had a fruitful roundtable with tech ceos in new york, discussing aspects relating to technology, innovation and more. also highlighted the strides made by india in this field. i am glad to see immense optimism towards india." pic.twitter.com/jzYDeyOxFf
— ANI (@ANI) September 23, 2024
Prime Minister Narendra Modi met the President of Palestine, Mahmoud Abbas on the sidelines of the Summit of the Future in New York.
— ANI (@ANI) September 23, 2024
Prime Minister expressed deep concern at the humanitarian crisis unfolding in Gaza and the deteriorating security situation in the region and… pic.twitter.com/1yag68juGe
Prime Minister Narendra Modi met Nepal Prime Minister KP Sharma Oli on the sidelines of UNGA. The two leaders discussed matters of mutual interest to strengthen cooperation in all areas of age-old, multi-faceted and expanding India-Nepal partnership: MEA Spokesperson Randhir… pic.twitter.com/2r9tQ4tyeb
— ANI (@ANI) September 23, 2024
भारतीय वंशाच्या नागरिकांशी साधला संवाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमधील भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हम आग की तरह जलाने वाले नहीं, सूरज की किरण की तरह रोशनी देने वाले हैं." त्यांच्या वक्तव्यानं उपस्थित भारतीय वंशांच्या नागरिकांनी मोठा जल्लोष केला. पुढं बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की "जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावत आहे. आज भारत जागतिक आपत्तीला प्रथम प्रतिसाद देणारा देश आहे. भारत आता संधींची भूमी झाला आहे. भारत आता संधींची वाट पाहत नाही, तर तो संधी निर्माण करतो. मागील 10 वर्षात भारतानं प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण केल्या आहेत. जगात दबाव वाढवण्याला भारताचं प्राधान्य नाही, तर जगात प्रभाव वाढवण्याला आता भारताचं प्राधान्य आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांची मैत्री अधिक मजबूत होत आहे. भारत आणि अमेरिकेची मैत्री जागतिक हितासाठी महत्वाची आहे." यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील बोस्टन आणि लॉस एंजेलिस इथं दोन नवीन दूतावास उघडण्याचा निर्णय जाहीर केला.
#WATCH | Prime Minister Narendra Modi holds a bilateral meeting with Crown Prince Sheikh Sabah Khaled Al-Hamad Al-Sabah Al-Sabah of Kuwait, in New York, US
— ANI (@ANI) September 22, 2024
(Source: ANI/DD News) pic.twitter.com/GQ3NtOWjEt
" hum aag ki tarah jalaane waale nahin, suraj ki kiran ki tarah...": pm modi to indian diaspora in us
— ANI Digital (@ani_digital) September 22, 2024
read @ANI Story | https://t.co/iOEE5hGHDQ#PMModi #IndianDiaspora #US #NewYork pic.twitter.com/eDAorcvUuS
#WATCH | " the meeting was very good," says nepal's prime minister kp sharma oli after his bilateral meeting with prime minister narendra modi, in new york, us pic.twitter.com/y0JpxTsFu8
— ANI (@ANI) September 22, 2024
भारताचं 5जी मार्केट अमेरिकेपेक्षा मोठं, आता 6जीची तयारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं विविध उद्योग जगतातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "भारताचं 5जी मार्केट हे अमेरिकेतील मार्केटपेक्षा मोठं आहे. हे केवळ मागील दोन वर्षात घडलं. आता भारत 6जी बनवण्याची तयारी करत आहे," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
#WATCH | Modi&US Event | PM Narendra Modi says, " today, india's 5g market is bigger than america. it has happened within two years. now, india is working on made-in-india 6g." pic.twitter.com/RP09n8lDfT
— ANI (@ANI) September 22, 2024
AI म्हणजे अमेरिका इंडिया स्पिरीट, पंतप्रधान मोदींनी सांगितली व्याख्या : न्यूयॉर्कच्या नासाऊ कोलिजियम इंथ भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी जगासाठी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, मात्र माझ्यासाठी एआय म्हणजे अमेरिका भारत. ही नवीन एआय शक्ती आहे. भारतीय नागरिकांनी नेहमीत जगात भारताचं नाव उज्वल केलं आहे. त्यामुळे भारतीय वंशाचे नागरिक देशाचे मजबूत ब्रँड अॅम्बेसडर आहेत. त्यामुळेच मी तुम्हाला राष्ट्रदूत असं म्हणतो. या राष्ट्रदुतांमुळेच आपला नमस्ते आता बहुराष्ट्रीय झाला आहे. तुम्ही भारताला अमेरिकेशी आणि अमेरिकेला भारताशी जोडलं आहे. तुमचं कौशल्य, आणि वचनबद्धता अतुलनीय आहे. परदेशात असून कोणताही महासागर तुम्हाला भारतापासून वेगळं करू शकत नाही. "वसुधैव कुटुंबकम" म्हणजेच "जग एक कुटुंब आहे" ही परंपरा कायम ठेवल्याबद्दल तुमचं करावं तेव्हढं कौतुक कमी आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- ढोल-ताशांचा गजर, शिवरायांचा जयजयकार; अमेरिकेत मोदींचं मराठमोळ्या स्टाईलनं स्वागत, पंतप्रधान म्हणाले.... - PM Modi Visit USA
- गर्भाशयाच्या कॅन्सरवर मात करण्याकरिता क्वाडची मोहिम, पंतप्रधान मोदींकडून ७.५ दशलक्ष डॉलरची मदत जाहीर - PM Modi us visit
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक ते पंतप्रधान पद, नरेंद्र मोदींच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावला? - narendra modi birthday