ETV Bharat / state

अर्धापूर-नांदेड महामार्गावर दुचाकीचा अपघात; एक ठार, दोन जखमी - नांदेड अपघात

अर्धापूर ते नांदेड मार्गावर दोन दुचाकींची जोरात धडक झाली. यात एकजण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. तसेच यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे.

संतोष कदम
author img

By

Published : Oct 30, 2019, 6:11 PM IST

नांदेड - अर्धापूर ते नांदेड मार्गावर दोन दुचाकींची जोरात धडक झाली. यात एकजण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. तसेच यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे. हा अपघात आज (बुधवारी) दीड वाजता घडला. अर्धापूर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सनशाईन गार्डन मंगल कार्यालयासमोर ही घटना घडली. यातील जखमींना महामार्ग पोलीस पथकांनी रूग्णालयात दाखल केले आहे.

accident
अर्धापूर-नांदेड महामार्गावर दुचाकीचा अपघात; एक ठार, दोन जखमी

हेही वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; पाच बिगर काश्मिरी मजूरांचा मृत्यू

नांदेडहून अर्धापूरकडे दुचाकी (क्रमांक- एमएच - २६ एक्यू ३५१६) वरून संतोष रामजी कदम (वय २९) जात होते. त्याच्या सोबत त्याचा मित्र विलास थोरातही होता.अर्धापूरहून नांदेडकडे जाणारी दुचाकी (क्रमांक- एमएच - 26 एयु ५७७८) वरुन सेवानिवृत्त सैनिक सुभाष बोराटे जात होते. दोन दुचाकींची जोराची धडक झाली. यात संतोष रामजी कदम यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुभाष बोराटे व विलास थोरात हे दोघे जखमी झाले आहेत. यातील सुभाष बोराटे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अपघाताची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे व महामार्ग सुरक्षा पथकाचे एआर रहेमान यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारार्थ दाखल करण्यासाठी मदत केली. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - 'आठवड्यातील वार सत्तेसाठी वाटून घ्या आणि उरलेला रविवार आठवलेंना द्या', आव्हाडांची टीका

Intro:दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; एक ठार, दोन जखमी. 

    ● अर्धापूर - नांदेड महामार्गावरील घटना ● 
Body:दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; एक ठार, दोन जखमी. 

    ● अर्धापूर - नांदेड महामार्गावरील घटना ● 

----------------------------------------------------------

     नांदेड: अर्धापूर कडून नांदेडकडे व नांदेड कडून अर्धापूरकडे जाणाऱ्या दोन दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. यात एकजण जागीच ठार झाला तर दोनजण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. हा अपघात दि. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजता अर्धापूर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सन शाईन गार्डन मंगल कार्यालयासमोर घडली. यातील जखमींना महामार्ग पोलीस पथकांनी रूग्णालयात दाखल केले आहे. 

          □ या बाबत अधिक माहिती अशी की, नांदेड कडून अर्धापूरकडे येणाऱ्या दुचाकी क्रं. एम.एच. - २६ ए क्यू.  ३५१६ वरून संतोष रामजी कदम वय २९ वर्षे रा. कोंढा व त्याचा मित्र विलास थोरात हे अर्धापूर कडे येत होते. ही दुचाकी अर्धापूर - नांदेड महामार्गावरील सनशाईन गार्डन मंगल कार्यालयासमोर येताच अर्धापूर कडून नांदेडकडे जाणारी दुचाकी क्रं. एम.एच. - २६ ए यु. - ५७७८ वरून अर्धापूर येथील सेवानिवृत्त सैनिक सुभाष बोराटे नांदेडकडे जात होते. या दोन दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. यात मोटारसायकल वरील संतोष रामजी कदम यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुभाष बोराटे व विलास थोरात हे दोघे जखमी झाले आहेत. यातील सुभाष बोराटे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. 

           □ अपघाताची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे व महामार्ग सुरक्षा पथकाचे ए. आर. रहेमान यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारार्थ दाखल करण्यासाठी मदत केली. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. 

 ( मयत संतोष कदम यांचा फोटो पाठविला आहे )

           -------------------------------------------

                                 Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.