नांदेड - जिल्ह्यातील कंधार येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील आरोपी माधवराव देव्हारे हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. यातूनच त्याने चार वर्षीय मुलाला पोत्यात बांधून गोदावरी नदीच्या पात्रात फेकून दिल्याची घटना २८ मार्चला घडली. ( four year old boy thrown into Godavari river ) ही घटना ३१ मार्चला उघडकीस आली. कंधार पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
पोलिसांनी खाक्या दाखवताच दिली कबुली - माधवराव देव्हारे असे आरोपीचे नाव असून, अभिषेक देव्हारे असे मृताचे नाव आहे. २८ मार्चला अभिषेक शाळेतून घरी परत न आल्याने २९ रोजी आई व नातेवाइकांनी कंधार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलीस निरीक्षक पडवळ, उपनिरीक्षक इंद्राळे, आदी नारनाळी (ता . कंधार) येथे पोहोचले व त्यांनी चौकशी केली. चौकशीत माधव हा उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलीस खाक्या' दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
गोदावरी नदीत फेकून दिले - पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, आरोपी माधव देव्हारे यांना दोन मुले आहेत, ते आपल्या पत्नीवर दोन दिवसाला तीन दिवसाला दारूचे नशेमध्ये येऊन भांडण करायचा. नेहमीच लहान मुलगा माझा नाही, असे सांगायचा. २८ रोजी मुलगा अभिषेकला पोत्यात बांधून त्याने नायगाव तालुक्यातील राहेर येथील गोदावरी नदीच्या पुलावरून फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनाही धक्का बसला.
पोलिसांकडून माधवला अटक - पोलिसांनी तपास केला असे ३० मार्चला अभिषेकचा मृतदेह धर्माबाद तालुक्यातील येला शिवारात गोदावरी नदीत पोत्यात बांधलेला पाण्यावर तरंगता आढळला. पोलिसांनी उत्तरीय तपास करून मृतदेहत नातेवाइकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी आरोपी माधव देव्हारे यांच्याविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात हत्या केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी आरोपी माधवला अटक केली आहे.
अपहरणाचा रचला होता बनाव - मुलगा अभिषेक हा बिस्कीट आणण्यासाठी दुकानावर गेला होता. त्यानंतर तो घरी परत आला नाही. त्याचे कुणीतरी अपहरण केले आहे, असा बनाव माधव देवारे याने केला होता. त्याने इतर कुटुंबियासोबत अभिषेकचा शोधही घेतला होता. परंतु तो न मिळाल्याने कंधार गाठून मुलाला आमिष दाखवून कुणी तरी पळवून नेल्याची तक्रार केली होती. त्यावरुन कंधार पोलिसांनी मिसिंगची नोंद केली होती. परंतु सुरुवातीपासूनच पोलिसांना माधव देव्हारे याच्यावर संशय होता. त्याची माहिती काढल्यानंतर पोलिसांना पक्का विश्वास बसला.
हेही वाचा - Gudi Padwa 2022: गुडी पाडव्याचे महत्व काय? गुडी कशी उभारावी? जाणून घ्या...