नांदेड - शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात एक लाख १६ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीची पातळी ३४९.१० मी झाली आहे. नांदेडमध्ये सतर्क पातळी ३५१.०० असल्याने गोदारी नदीच्या पातळीतील वाढ लक्षात घेता नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शहर आणि जिल्ह्यामध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदी सध्या धोक्याच्या पातळीच्या जवळून वाहत आहे. परिणामी नांदेड शहरातील गोदावरी नदीवरच्या नावघाट येथील पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर, गोवर्धन घाट इथल्या स्मशानभूमीला नदीच्या पाण्याने विळखा घातला आहे. त्यामुळे, सध्या शहरात पूर सदृश्य परिस्थिती कायम आहे. प्रशासनाने सावधानतेचा इशारा कायम ठेवला आहे. त्यामुळे, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा : नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप वाया; शेतकरी आर्थिक अडचणीत