ETV Bharat / state

नांदेडमधील शिवधारा पतसंस्थेची अल्पावधीतच भरीव कामगिरी - राजश्री पाटील

author img

By

Published : Aug 27, 2019, 2:09 PM IST

पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीत सभासद आणि कमर्चारी या सर्वांचा मोलाचा वाटा आहे, असे वक्तव्य शिवधारा पतसंस्थेच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी केले.

शिवधारा पतसंस्थेची ८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

नांदेड - शिवधारा पतसंस्थेची ८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सर्व संचालक मंडळ, सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवमळा (मरळक फाटा, नांदेड) येथे पार पडली. यावेळी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीत सभासद आणि कमर्चारी या सर्वांचा मोलाचा वाटा आहे, असे वक्तव्य पतसंस्थेच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी केले.

पंतसंस्थेची आतापर्यंतची वाटचाल ही यशस्वी असून येत्या काळात शिवधाराचा उल्लेख राज्यातील यशस्वी पतसंस्थेमध्ये नक्कीच होईल, असा ठाम आत्मविश्वास पाटील यांनी व्यक्त केला. आजपर्यंतच्या वाटचालीत, पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये ठेवीदार, ग्राहकांनी सहकार्य केले. त्यामुळेच हा पल्ला गाठता येऊ शकला. पुढेही असेच योगदान मिळावे, असेही त्या म्हणाल्या.

जिल्हा उपनिबंधक पी.आर.फडणवीस बोलताना म्हणाले, की शिवधारा या संस्थेने योग्य व्यवस्थापन केले असून त्यांनी आदर्श सि.डी.रेषो मेंटन केला आहे. संस्थेनी जास्तीत जास्त बचत गटांना लघुउद्योगासाठी ऋण वाटप करुन प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. प्रस्ताविकात संस्थेचे तज्ञ संचालक धनंजय तांबेकर यांनी संस्थेच्या मागील आर्थिक वर्षाच्या कामकाजाचा अहवाल व ताळेबंदाचे वाचन केले.

सभेत उत्कृष्ट ठेवीदार विनोद अलमपल्लेवार, उत्कृष्ट कर्जदार गोविंद डाकोरे, उत्कृष्ट दैनिक ठेव प्रतिनिधी जलील अहमद, संतोष कदम, ज्ञानदेव कदम यांना पुरस्कार व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा विशेष लेखा परीक्षक डी.ए. बैसठाकूर, उपाध्यक्ष कीर्ती तगडपल्लेवार, संचालिका उषा पाटील, सुचिता उखलकर, प्रतीक्षा पतंगे, व्यवस्थापक (प्रशासन) सुरेखा दवे, शाखा प्रभारी आनंद संगावार, सहायक अधिकारी अल्का बोलके, यांच्यासह समस्त कर्मचारी ठेवीदार आणि सभासद उपस्थित होते.

Intro:शिवधाराची अल्पावधीतच भरीव कामगिरी- राजश्री पाटील
-------------------------------------------------------------

नांदेड : शिवधारा महीला नागरी सहकारी पतसंस्थेच्या आता पर्यंतच्या यशस्वी वाटचालीत सभासद, कमर्चारी या सर्वांचा मोलाचा वाटा असल्यामुळे शिवधाराने अल्पावधीतच भरीव कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन शिवधारा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी केले.Body:शिवधाराची अल्पावधीतच भरीव कामगिरी- राजश्री पाटील
-------------------------------------------------------------

नांदेड : शिवधारा महीला नागरी सहकारी पतसंस्थेच्या आता पर्यंतच्या यशस्वी वाटचालीत सभासद, कमर्चारी या सर्वांचा मोलाचा वाटा असल्यामुळे शिवधाराने अल्पावधीतच भरीव कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन शिवधारा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी केले.

शिवधारा पतसंस्थेची 8 वी वार्षीक सर्वसाधारण सभा सर्व संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी यांच्या उपस्थिती मध्ये शिवमळा, मरळक फाटा, नांदेड येथे पार पडली यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील बोलताना त्या म्हणाल्या की, पतसंस्थेच्या प्रत्येक सभासदामध्ये ही भावना सदैव असते की पतसंस्था वाढली मोठी झाली तर तिचे भविष्य उज्वल आहे. यामुळे आतापर्यंतची वाटचाल ही यशस्वी असून येत्या काळात शिवधाराचा उल्लेख राज्यातील यशस्वी पतसंस्था मध्ये नक्कीच होईल असा ठाम आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. आजपर्यंतच्या वाटचालीत, पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये ठेवीदार, ग्राहकांनी सहकार्य केले योगदान दिले. त्यामुळेच हा पल्ला गाठता येऊ शकला. पुढेही असेच योगदान मिळावे असेही त्या म्हणाल्या.
यावेळी जिल्हा उपनिबंधक पी.आर.फडणवीस बोलतांना म्हणाले की शिवधारा या संस्थेचे उत्कृष्ट मॅनेजमेंट असून त्यांनी आदर्श सि.डी.रेषो मेंटन केला आहे. संस्थेनी जास्तीत जास्त बचत गटांना लघुउद्योगासाठी ऋण वाटप करून प्रोत्साहन द्यावे असे आवाहन याप्रसंगी केले. प्रस्ताविकात संस्थेचे तज्ञ संचालक धनंजय तांबेकर यांनी संस्थेच्या मागील आर्थिक वर्षाच्या कामकाजाचा अहवाल व ताळेबंदाचे वाचन केले. सूत्रसंचालन संदीप पावडे तर आभार सचिव नीता कटकमवार यांनी मानले. यावेळी उत्कृष्ट ठेवीदार विनोद अलमपल्लेवार, उत्कृष्ट कर्जदार गोविंद डाकोरे, उत्कृष्ट दैनिक ठेव प्रतिनिधी जलील अहमद, संतोष कदम, ज्ञानदेव कदम यांना पुरस्कार व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा विशेष लेखा परीक्षक डी.ए. बैसठाकूर, उपाध्यक्ष कीर्ती तगडपल्लेवार, संचालिका उषा पाटील, सुचिता उखलकर, प्रतीक्षा पतंगे, व्यवस्थापक (प्रशासन) सुरेखा दवे, शाखा प्रभारी आनंद संगावार, सहायक अधिकारी अल्का बोलके, यांच्यासह समस्त कर्मचारी ठेवीदार, सभासद उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.