ETV Bharat / state

नांदेडमध्ये ८० लाख रुपयांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखू विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले.

जप्त केलेला गुटखा
author img

By

Published : Jun 24, 2019, 9:29 AM IST

Updated : Jun 24, 2019, 10:20 AM IST

नांदेड - शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत ८० लाख रुपयांचा गुटख्यासह १ ट्रक, कंटेनर असा एकूण १ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ही कारवाई केली.

कारवाईबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी

शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखू विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार देगलूर नाका येथे छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या संशयित ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये १८ लाख ३६ हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील असना टी पॉईंट येथे संशयित कंटनेर उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याठिकाणीही छापा टाकण्यात आला. कंटनेरची तपासणी केली असता त्यामध्ये वर दुसरा माल व त्याखाली गुटखा, पान मसाला आदी पदार्थ असा एकूण ६१ लाख ९ हजारांचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही प्रकरणात ट्रक, कंटेनरसह गुटखा असा एकूण १ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Intro:नांदेड - ८० लाखांचा गुटखा व जर्दा जप्त.

- ट्रक व कंटेनर ताब्यात, १ कोटी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

नांदेड : नांदेड शहरात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व सुगंधीत तंबाखू विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशामुळे
देगलूर नाका व आसना पुलाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत सुमारे ८० लाखांचा गुटखा व ट्रक, कंटेनर असा एकूण १ कोटी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.Body:जुन्या शहरातील नेकलेस रोड इतवारा भागात संशयित ट्रक क्रमांक एमएच १३ जी ६५९९ हा उभा असून,त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने, सदर
ठिकाणी स्थागुशाच्या पथकाने छापा मारला असता त्यांना गुटख्याने भरलेला ट्रक मिळून आला.या ट्रकमध्ये शासनाने प्रतिबंध घातलेला १८ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा गोवा गुटखा मिळून
आला.या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे यांना माहिती देण्यात आली.
त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि त्यांच्याच फिर्यादी वरून इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई होत असतानाच शहरातील आसना टी पॉईन्ट नांदेड येथे कंटेनर क्रमांक एचआर ५५ एक्स ८७१८ हा उभा असून, त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. सदर माहितीवरुन स्थागुशा पथकाने छापा मारुन गुटख्याने भरलेला कंटेनर पकडला.हा कंटेनर ताब्यात घेऊन पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आणण्यात आला. या कंटेनरमध्ये वर वर दुसराच माल ठेवून
उर्वरित ८० टक्के भागात प्रतिबंधित गुटखा,पान मसाला,जर्दा आढळून आला.या सर्व मालाची मोजदाद केली असता राजनिवास पान मसाला व जर्दा,रत्ना तंबाखू,लक्ष्मी निवास पानमसाला असा एकूण ६१ लाख ९ हजारांचा माल आढळून आला.या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे यांच्या तक्रारीवरून पो. स्टे. विमानतळ नांदेड येथे गुन्हा दाखल झाला आहे.Conclusion:या दोन्ही कारवाया शनिवारी मध्यरात्री व रविवारी दिवसभर करण्यात आल्या.या दोन्ही छाप्यांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, रत्ना तंबाखू, पानमसाला,एक ट्रक, एक कंटेनर असा एकूण १ कोटी १६ लाख ४६ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कामगिरी विशेष पोलीस
महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिदे,शहर
उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फसके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे,स.पो.नि.पी.डी.भारती, सपोउपनि रमेश खाडे, यांनी पार पाडली आहे.
Last Updated : Jun 24, 2019, 10:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.