ETV Bharat / state

नांदेडमध्ये आढळले कोरोनाचे पाच नवीन रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 143 वर

गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाचे पाच नवीन रुग्ण आढळले. बाधित रुग्णांमध्ये तीन नांदेड जिल्ह्यातील तर दोन जण हिंगोलीचे आहेत. नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे नांदेडमधली रुग्णसंख्या 143 वर पोहोचली आहे. नांदेडमधील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी १०४ पैकी ९७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

author img

By

Published : May 29, 2020, 10:10 AM IST

Nanded Government Hospital
नांदेड शासकीय रुग्णालय

नांदेड - गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाचे पाच नवीन रुग्ण आढळले. बाधित रुग्णांमध्ये तीन नांदेड जिल्ह्यातील तर दोन जण हिंगोलीचे आहेत. नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे नांदेडमधली रुग्णसंख्या 143 वर पोहोचली आहे तर आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात दिलासादायक स्थिती होती. कोरोनाचा केवळ एकच रुग्ण आढळला होता. मात्र, शुक्रवारी पुन्हा पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे नांदेडची रुग्णसंख्या वाढली आहे. या रुग्णांमध्ये मिल्लतनगर, लोहारगल्ली-मुखेड, कसबे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा तर हिंगोलीतील दोन रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये चार पुरुष व एका स्त्रीचा समावेश असून सर्व 28 ते 40 या वयोगटातील आहेत. नांदेडमधील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरूवारी १०४ पैकी ९७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.