नांदेड - तहसील कार्यालयाच्या इमारतीवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहा येथे घडली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. भीमराव चंपती शिरसाठ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
काही नागरिकांना तहसील कार्यालयाच्या इमारतीवर दोरीला लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह दिसला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. लोहा तालुक्यातील उमरा येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेमुळे लोहा परिसरात खळबळ-
लोहा तहसील कार्यालयात एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी दुपारी हा प्रकार समोर आला आहे. भीमराव चंपती शिरसाठ या ४२ वर्षीय व्यक्तीने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. हा व्यक्ती लोहा तालुक्यातील उमरा येथील असल्याची माहिती आहे. तहसील कार्यालयात आत्महत्या करण्याचं नेमकं कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे. सदरील घटनेचा तपास लोहा पोलीस करत आहेत.