नांदेड - जिल्ह्यात बुधवारी 398 जणांचा अहवाल कोरोना पॅाझिटिव्ह आला आहेत. यामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे 252 तर अँटिजेन तपासणीद्वारे 146 अहवाल पॅाझिटिव्ह आले आहे. तर आज 482 कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 85 हजार 943 वर गेली असून आतापर्यंत 79 हजार 257 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या तीन दिवसात 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू असून जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या 1 हजार 757 वर गेली आहे.
गेल्या तीन दिवसांत 16 मृत्यू
10, 11 व 12 मे 2021 या तीन दिवसांच्या कालावधीत 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या 1 हजार 757 एवढी झाली आहे.
482 कोरोना बाधित झाले बरे
आज जिल्ह्यातील 482 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 12, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 150, मांडवी कोविड केअर सेंटर 6, देगलूर कोविड रुग्णालय 10, अर्धापूर तालुक्यांतर्गत 14, धर्माबाद तालुक्यांतर्गत 11, खाजगी रुग्णालय 101, जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय 6, मुखेड कोविड रुग्णालय 18, मुदखेड कोविड केअर सेंटर 32, किनवट कोविड रुग्णालय 8, कंधार तालुक्यांतर्गत 9, बिलोली तालुक्यांतर्गत 32, माहूर तालुक्यांतर्गत 8, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 5, भोकर तालुक्यांतर्गत 13, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 36, हदगाव कोविड रुग्णालय 3, लोहा तालुक्यांतर्गत 2, मालेगाव टिसीयू कोविड रुग्णालय 3, उमरी तालुक्यांतर्गत 3 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 20, जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालय येथे 53, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे 57, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर येथे 29 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्यात कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती -
एकूण घेतलेले स्वॅब- 4 लाख 90 हजार 657
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 94 हजार 593
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 85 हजार 943
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 79 हजार 257
एकूण मृत्यू संख्या-1 हजार 757
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.22 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-28
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-264
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 4 हजार 591
अतिगंभीर प्रकृती असलेले रुग्ण -17