नांदेड - जिल्ह्यात आज (दि. 17 जून) प्राप्त झालेल्या 1 हजार 815 अहवालापैकी 38 अहवाल कोरोनाग्रस्त आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 7 तर अँटिजेन तपासणीद्वारे 31 अहवालबाधित आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण बाधितांची संख्या 91 हजार 31 एवढी झाली असून यातील 88 हजार 227 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 342 सक्रिय रुग्ण असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 900
आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 1 हजार 900 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका 3, मुखेड तालुक्यांतर्गत 1, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 1, हदगाव 1 तर अँटिजन तपासणीद्वारे नांदेड महापालिका 8, लोहा 1, नांदेड ग्रामीण 4, मुदखेड 1, कंधार 13, परभणी 1, किनवट 2, यवतमाळ 1 असे एकूण 38 बाधित आढळले.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकूण घेतलेले स्वॅब- 5 लाख 84 हजार 695
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 82 हजार 179
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 31
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 227
एकूण मृत्यू संख्या-1 हजार 900
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.91 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-160
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 342
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2
हेही वाचा - नांदेड रेल्वे विभागातून 200 वी किसान रेल्वे रवाना, शेतकऱ्यांना मालवाहतुकीवर 50 टक्क्यांची सूट