नांदेड - विष्णूनगर भागात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल 35 तोळे चांदी आणि 3 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. गौरक्षण हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या गणेश राशिवंत यांच्या घरात ही चोरी झाली.
घरातील सर्वजण झोपेत असताना चोरट्यांनी ही चोरी केली आहे. यामध्ये ३५ तोळे चांदी, 3 लाख रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक पाचारण करून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फायदा झाला नाही.