ETV Bharat / state

शेतकऱ्यांना उष्णतेचा फटका, नांदेडमधील शेतकऱ्याची ३ एकर केळीची बाग करपली

author img

By

Published : Jun 1, 2019, 1:31 PM IST

नांदुसा येथील गणेश तुकाराम जनाकवाडे आणि मारोती तुकाराम जनाकवाडे यांनी आपल्या ३ एकर शेतीमध्ये केळीची लागवड केली होती. मात्र, उष्ण तापमानामुळे त्यांच्या केळी पिकांवर परिणाम होऊन त्यांची केळीची बाग जळाली आहे.

केळीची बाग

नांदेड - जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला मोठ्या अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. नांदेड तालुक्यातील नांदुसा येथील एक ३ एकर केळीची बाग तीव्र तापमानामुळे करपली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

केळीची बाग

नांदुसा (ता.नांदेड) येथील गणेश तुकाराम जनाकवाडे आणि मारोती तुकाराम जनाकवाडे यांनी आपल्या ३ एकर शेतात केळीची लागवड केली आहे. मात्र, जिल्ह्यात काही दिवसांपासून तीव्र तापमानाने उच्चांक गाठला असल्याने याचा परिणाम त्यांच्या केळी पिकांवर झाला आहे. केळीची सर्व पाने करपून गेले आहेत. शिवाय केळीचे घडही आपोआप गळून पडत आहे. त्यांना केळी पिकांसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. मात्र, उच्च तापमानाने त्यांच्या केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

केळीला बाजारपेठ चांगली असून जनाकवाडे यांच्या शेतातून केळीचे उत्पादन होत नसल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. केळीच्या घडांची वाढ का होत नाही, याबाबत त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. मात्र, अद्याप कृषी अधिकारी पाहणी करण्यासाठी फिरकले नाहीत. लाखो रुपयांचे केळी पीक वाया गेल्याने जनाकवाडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आम्ही ३ एकर शेतीमध्ये केळीची लागवड केली. शेतात पाणी पुरवठा मुबलक प्रमाणात आहे. केळीला पाणी व्यवस्थित दिले होते. पण तापमानामुळे केळी पूर्णतः करपून गेल्या आहेत.ऐन सिझनच्या काळात आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्वरित पीक विमा मंजूर करावा, अशी मागणी गणेश तुकाराम जनाकवाडे या शेतकऱ्यांनी केली आहे.

Intro:नांदुसा येथे उष्ण तापमानाने तीन एकर केळी करपली.....!

नांदेड: जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला मोठया अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत असतांना आता प्रखर उष्णतेचा फटका शेतकऱ्याला सहन करावा लागतो आहे. नांदेड तालुक्यातील नांदुसा येथील तीन एकर केली तीव्र तापमानामुळे करपल्या असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Body:नांदुसा येथे उष्ण तापमानाने तीन एकर केळी करपली.....!

नांदेड: जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला मोठया अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत असतांना आता प्रखर उष्णतेचा फटका शेतकऱ्याला सहन करावा लागतो आहे. नांदेड तालुक्यातील नांदुसा येथील तीन एकर केली तीव्र तापमानामुळे करपल्या असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील नांदुसा (ता.नांदेड) येथील गणेश तुकाराम जनाकवाडे व मारोती तुकाराम जनाकवाडे यांनी आपल्या तीन एकर शेती मध्ये केळीची लागवड केली आहे. परंतु जिल्हयात मागील काही दिवसांपासून तीव्र तापमानाने उच्चांक गाठला असल्याने याचा परिणाम त्यांच्या केळी पिकांवर झाला आहे. केळीचे सर्व पाने करपून गेले आहेत. शिवाय केळीचे घडही आपोआप गळून पडत आहे. त्यांना केळी पिकांसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपल्ब्ध आहे. परंतु उच्च तापमानाने त्यांच्या केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या केळीला बाजारपेठ चांगली असून जनाकवाडे यांच्या शेतातून केळी चे उत्पादन होत नसल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. केळीच्या घडांची वाढ का होत नाही या बाबत त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले परंतु अद्याप कृषी अधिकारी मात्र पाहणी करण्यासाठी फिरकले नाहीत. लाखो रुपयांची केळी पीक वाया गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे

आम्ही तीन एकर शेती मध्ये केळी ची लागवड केली. शेतात पाणी पुरवठा मुबलक प्रमाणात आहे.केळीला पाणी व्यवस्थीत दिले होते. परंतु तापमानामुळे केळी पूर्णतः करपून गेल्या आहेत.ऐन सिझन काळात आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्वरित पीक विमा योजना मंजूर करावा. अशी मागणी गणेश तुकाराम जनाकवाडे या शेतकऱ्यांनी केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.