नांदेड - आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यातील 28 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझेटिव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 15, तर अँटिजेन तपासणीद्वारे 13 रुग्ण कोरोना पॉझेटिव्ह आढळले आहेत. याचबरोबर उपचार घेत असलेले 23 कोरोनाबाधित बरे झाले असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
एकूण 388 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार
आज एकूण 1 हजार 37 अहवालांपैकी 973 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 20 हजार 388 एवढी झाली असून, यातील 19 हजार 257 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 388 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती गंभीर आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यातील ५४९ व्यक्तींचा मृत्यू
आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 549 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 94.45 टक्के आहे. आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 5, भोकर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, खाजगी रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड केंद्र 9, मुखेड तालुक्यांतर्गत 1, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, असे एकूण 23 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 10, लोहा तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 2, किनवट 2, असे एकूण 15 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 10, माहूर तालुक्यात 1, देगलूर 1, मुखेड 1, असे एकूण 13 बाधित आढळले.
जिल्ह्यात 388 बाधितांवर उपचार सुरू
जिल्ह्यात 388 बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 34, जिल्हा रुग्णालय कोविड केंद्र नांदेड येथे 27, जिल्हा रुग्णालय कोविड केंद्र नांदेड (नवी इमारत) येथे 34, मुखेड कोविड रुग्णालय 17, किनवट कोविड रुग्णालय 6, हदगाव कोविड रुग्णालय 8, देगलूर कोविड रुग्णालय 10, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 86, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 132 आणि खाजगी रुग्णालय येथे 34 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - विशेष : शेतकऱ्याने कल्पकतेने बनवला सेंद्रिय ब्रँड; परराज्यातून होतेय मालाची मागणी.. !