नांदेड - आज सोमवारी प्राप्त झालेल्या एकूण 76 अहवालापैकी 72 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर 2 रुग्णांचा रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 192 झाली आहे. प्राप्त 2 अहवालापैकी गुलजार बाग देगलूर नाका येथील स्त्री रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 192 रुग्णांपैकी 131 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 52 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतपर्यंत 9 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उर्वरित 52 रुग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 11 रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 38, उपजिल्हा रुग्णालय मुखेड 2 तसेच ग्रामीण रुग्णालय माहूर कोविड केअर सेंटर येथे 1 रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
नांदेड कोरोना अपडेट -
आत्तापर्यंत एकूण संशयित - 4453
क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2329
अजून निरीक्षणाखाली असलेले - 86
पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 183
घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4044
आज घेतलेले नमुने - 17
एकूण नमुने तपासणी- 4487
एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 192
पैकी निगेटीव्ह - 4014
नमुने तपासणी अहवाल बाकी- 17
नाकारण्यात आलेले नमुने - 81
अनिर्णित अहवाल – 176
कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 131
कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 9