ETV Bharat / state

नांदेडमधील 18 जणांचा अहवाल निगेटिव्ह; कोरोनाबाधिताच्या आले होते संपर्कात

भोकर-म्हैसा रस्त्यावरील राहटी तपासणी नाक्यावर 16 एप्रिलला तेलंगणा राज्यातील करीमनगर येथील आंब्याच्या ट्रकसोबत कोरोनाबाधीत चालक आला होता. तपासणीदरम्यान भोकर पोलीस ठाण्याचे तीन पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि परिवहन विभागाचे काही अधिकारी, कर्मचारी त्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले होते. म्हणून शनिवारी १८ जणांची नांदेड येथे तपासणी करून त्यांचा स्वॅब औरंगाबाद प्रयोगशाळेत पाठविण्यात आला.

नांदेडमधील 18 जणांचा अहवाल निगेटिव्ह
नांदेडमधील 18 जणांचा अहवाल निगेटिव्ह
author img

By

Published : Apr 20, 2020, 11:42 AM IST

भोकर (नांदेड) - तेलंगणा राज्यातील कोरोनाबाधित ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्या येथील 18 जणांच्या घशाचा द्रव तपासणीचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे यांनी या माहितीला दुजोरा दिला. यासोबतच शुक्रवारी नांदेडहून पाठवलेल्या एकूण 48 जणांचा अहवालदेखील निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती मीडिया समन्वयक आणि उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली. यामुळे आतापर्यंत निगेटिव्ह आलेल्या अहवालाची संख्या 368 वर गेली आहे. एकही व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आलेला नाही.

भोकर-म्हैसा रस्त्यावरील राहटी तपासणी नाक्यावर 16 एप्रिलला तेलंगाणा राज्यातील करीमनगर येथील आंब्याच्या ट्रकसोबत कोरोनाबाधीत चालक आला होता. तपासणीदरम्यान भोकर पोलीस ठाण्याचे तीन पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि परिवहन विभागाचे काही अधिकारी, कर्मचारी त्या कोरोनाबाधीताच्या संपर्कात आले होते. म्हणून शनिवारी १८ जणांची नांदेड येथे तपासणी करून त्यांचा स्वॅब औरंगाबाद प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. रविवारी रात्री उशिरा त्या १८ जणांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली.

दुसरा अहवाल आल्यानंतर सर्वांना घरी जाण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधीत ट्रकचालकाच्या संपर्कात आलेल्यांचा अहवाल काय येईल? याबाबत भोकर तालुक्यातील नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.