नांदेड - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 275 अहवालापैकी 169 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 106 तर अँटिजेन तपासणीद्वारे 63 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 87 हजार 896 एवढी झाली असून यातील 83 हजार 897 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 845 रुग्ण उपचार घेत असून 63 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. गत तीन दिवसात सात जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 845 एवढी आहे.
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 98, जिल्हा रुग्णालय कोविड रुग्मालय नांदेड येथे 82, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 80, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती -
एकूण घेतलेले स्वॅब- 5 लाख 12 हजार 130
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 13 हजार 954
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 87 हजार 896
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 83 हजार 897
एकूण मृत्यू संख्या-1 हजार 845
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.45 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णित संख्या-4
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-45
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-236
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 725
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-63