नांदेड - शहरातील 35 पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण 304 व्यक्तींपैकी 265 रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. संबंधित व्यक्तींपैकी 218 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले असून त्यांपैकी 218 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहेत. सर्व अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहे. गेल्या २४ तासांत १५ नमुन्यांचा अहवाला निगेटिव्ह आला असून ५१ अहवाल प्रलंबित आहे. तसेच गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकही नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे.
आतापर्यंत एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 92 हजार 86 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकूण 1440 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1329 स्वॅब तपासणीचाचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून 51 चा अहवाल प्रलंबित आहे. घेतलेल्या एकूण स्वॅबपैकी 35 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. संबंधित 35 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 6 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णूपुरी नांदेड व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 22 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित 7 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4 रुग्ण हे मृत झाले असून उर्वरित 3 रुग्ण फरार असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच एकूण 1457 क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींपैकी 482 व्यक्तींचा क्वारंटाइन कालवधी पूर्ण झालेला आहे.
औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे आतापर्यंत एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू झालेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. त्यामुळे संबंधित आजाराने बाधित असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील संक्षिप्त माहिती -
- आत्तापर्यंत एकूण संशयित - 1580
- एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-1457
- क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 482
- अजून निरीक्षणाखाली असलेले - 119
- रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये -179
- घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -1278
- गुरुवारी तपासणीसाठी घेतलेले नमुने - 42
- एकूण नमुने तपासणी- 1440
- एकूण पॉझिटीव्ह रुग्ण- 35
- एकूण निगेटीव्ह - 1329
- नमुने तपासणी अहवाल बाकी- 51
- नाकारण्यात आलेले नमुने - 5
- अनिर्णित अहवाल – 19
- कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 4
- जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 92 हजार 86 आले आहेत. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.