नांदेड - जिल्ह्यात बुधवारी 1 हजार 372 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे 883 तर अँटीजेनद्वारे 489 अहवाल बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 71 हजार 791 एवढी झाली असून यातील 55 हजार 980 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सध्या 14 हजार 228 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 239 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. तीन दिवसांच्या कालावधीत 25 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 322 एवढी झाली आहे.
1 हजार 219 कोरोनामुक्त, 14,228 रुग्णांवर उपचार
बुधवारी 1 हजार 219 कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. तर 14 हजार 228 बाधितांवर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकूण घेतलेले स्वॅब - 4 लाख 27 हजार 25
एकूण निगेटिव्ह स्वॅब - 3 लाख 46 हजार 913
एकूण कोरोना बाधित व्यक्ती - 71 हजार 791
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 55 हजार 980
एकूण मृत्यू संख्या - 1 हजार 322
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.97 टक्के
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 14 हजार 228
हेही वाचा - Maharashtralockdown : राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू; नवीन नियमावली जाहीर