ETV Bharat / state

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात कोविडविषयी जनजागृती करावी - सुनील केदार - जिल्हा परिषद नागपूर न्यूज

सध्या शाळा बंद असल्याने शिक्षकांना जागृतीचे काम देण्यात यावे. कोविड संबधीत कार्यात सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांव्यतिरिकत उपलब्ध शिक्षकांना हे काम द्यावे. ज्या गावात शिक्षक शिकवतात त्याच गावात त्यांना प्रबोधनाचे काम देण्याची सूचना केदार यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा परिषद
जिल्हा परिषद
author img

By

Published : Jun 1, 2021, 11:57 AM IST

Updated : Jun 1, 2021, 12:45 PM IST

नागपूर - कोरोनाची तिसरी लाट लहान मुले व बालकांसाठी घातक ठरू शकते असे संकेत वैद्यकीय तज्ज्ञांकडून मिळत आहे. सोबतच म्युकरमायकोसिसचा वाढता प्रकोप वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे निर्देश पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षा रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, अप्पर जिल्हाधिकारी शिरीष पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात कोविडविषयी जनजागृती करावी

केअर सेंटर उभारण्याबाबतचा प्रगतीपर आढावा

वैयक्तिक स्वच्छता व कोविड अनुषंगीक जीवनशैली वर्तनासाठी शिक्षक चांगल्या पध्दतीने काम करू शकतात. माहिती-प्रबोधनाव्दारे ते नागरिकांना प्रोत्साहन देऊ शकतात. सध्या शाळा बंद असल्याने शिक्षकांना जागृतीचे काम देण्यात यावे. कोविड संबधीत कार्यात सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांव्यतिरिकत उपलब्ध शिक्षकांना हे काम द्यावे. ज्या गावात शिक्षक शिकवतात त्याच गावात त्यांना प्रबोधनाचे काम देण्याची सूचना केदार यांनी यावेळी दिल्या. गेल्या बैठकीतील मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच पदाधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या. त्यामध्ये तालुकानिहाय पॅडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याबाबतचा प्रगतीपर आढावा घेण्यात आला.

सुरक्षा उपाय कटाक्षाने पाळावे
गेल्या बैठकीतील चर्चेप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन निधीतून या पॅडीयाट्रीक कोविड केअर सेंटरचे काम करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, त्या निधी मिळण्यात काही अडचण येत असल्यास राष्ट्रीय आरोग्य मोहिमेतून करता येईल का ही बाब तपासून घेण्याचे त्यांनी सूचविले. कोविड-19 अंतर्गत पदभरती जाहिरातीच्या कामाची त्यांनी विचारणा केली. वैद्यकीय तज्ज्ञ व अन्य पदांची जाहिरात दिली असून अद्याप अर्ज प्राप्त झाले नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी सेलोकार यांनी सांगितले. सध्या तालुकानिहाय दोन अधिकाऱ्यांमार्फत गावोगाव कोविड व म्युकरमायकोसिसबाबत जाणिव जागृती सुरू आहे. तसेच यु-टयुब लाईव्हव्दारे अंगणवाडी सेविका, आशांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुभेंजकर यांनी सांगितले. कोवीड रुग्णसंख्येचा आलेख कमी होत असल्याचे आकड्यांवरून दिसत असले तरी सुरक्षा उपाय कटाक्षाने पाळावे लागतील, असेही ते म्हणाले.

पॅडीयाट्रीक कोविड केअर सेंटर संदर्भात चर्चा-
प्रस्तावित पॅडीयाट्रीक कोविड केअर सेंटर भिवापूर तालुक्यात प्रा. आ. केंद्र सोमनाळा, हिंगणा तालुक्यात प्रा. आ. केंद्र टाकळघाट, रामटेक तालुक्यात प्रा. आ. केंद्र मनसर, नागपूर तालुक्यात प्रा. आ. केंद्र सालई गोधणी, काटोल तालुक्यात प्रा. आ. केंद्र येनवा, कळमेश्वर तालुक्यात प्रा. आ. केंद्र धापेवाडा, सावनेर तालुक्यात पाटणसावंगी, कुही तालुक्यात प्रा. आ. केंद्र तितूर, नरखेड तालुक्यात प्रा. आ. केंद्र भिष्णूर, कामठी तालुक्यात प्रा. आ. केंद्र भूगाव, मौदा तालुक्यात प्रा. आ. केंद्र धानला, पारशिवणी तालुक्यात प्रा. आ. केंद्र साटक, उमरेड तालुक्यात प्रा. आ. केंद्र पाचगाव कोविड आढावा बैठकीनंतर महाराष्ट्र्र पशुविज्ञान विद्यापीठ (माफसू) मध्ये फुटाळा तलावातील पाणी पुर्ववत करण्याबाबत त्यांनी माफसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, महानगरपालीकेच्या अभियंता श्वेता बॅनर्जी व मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Last Updated : Jun 1, 2021, 12:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.