नागपूर - प्रेयसीसोबत लॉजमध्ये गेलेल्या एका पंचवीस वर्षीय तरुणाचा ( Ajay parteki death saoner Nagpur ) संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरात घडली. अजय परतेकी असे ( Ajay parteki death in lodge ) या तरुणाचे नाव आहे. त्याने स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचे अतिसेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तरुणाच्या खिशात स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचे पाकीट आढळून आल्याने पोलिसांनी तसा अंदाज व्यक्त केला आहे.
हेही वाचा - Dengue Prevention Survey : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना, घरोगीरी जाऊन सर्वेक्षण
स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचे पाकीट आढळले - अजय आणि त्याची प्रेयसी काल संध्याकाळी सावनेर येथील एका लॉजमध्ये गेले होते. लॉजमध्ये गेल्यानंतर अजय अचानक बेशुद्ध झाला. या बाबत अजयच्या प्रेयसीने लॉजमध्ये काम करणाऱ्यांना माहिती दिली, सोबतच अजयच्या मित्रांना देखील बोलावून घेतले होते. अजयला डॉक्टरांकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर घटनेची माहिती सावनेर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना अजयच्या खिशात स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचे एक पाकीट आढळून आले. या गोळ्यांचे अतिसेवन केल्यामुळे अजयचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
त्या घटनेची पुनरावृत्ती - गेल्यावर्षी ७ जानेवारीला नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्याच्या अगदी शेजारी असलेल्या खापरखेडा पोलीस ठाण्यातील एका लॉजमध्ये पॉर्न व्हिडिओ बघून नव-नवीन पद्धतीने सेक्स करताना एका 28 वर्षीय तरुणाचा गळफास लागून मृत्यू झाला होता. शरीर संबंध ठेवताना काही तरी वेगळे करण्याच्या नादात गळफास लागून तरुणाच्या जिवावर बेतले होते, त्याच घटनेची पुनरावृत्ती आज झाल्याची चर्चा आहे.
हेही वाचा - Deception of youth through Agneepath : अग्निपथ योजनेतून देशातील युवकांची फसवणूक