ETV Bharat / state

जुगारातील पैशाच्या वादातून नागपुरात तरुणाची हत्या

author img

By

Published : Jul 31, 2019, 10:18 AM IST

आनंदने रितेश शिवरेकर याच्याकडून १५ हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, ते त्याने वेळेत परत केले नव्हते. त्यामुळेच रितेश आणि आनंदमध्ये वाद सुरू होता. सोमवारी आनंद दिसताच रितेश आणि त्याच्या चार सहकाऱ्यांनी आनंदवर चाकू हल्ला करत त्याची हत्या केली.

मृत आनंद शिरपूरकर

नागपूर- जुगारातील पैशाच्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. आनंद शिरपूरकर असे मृत तरुणाचे नाव आहे. शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत गुजर नगर परिसरात ही करण्यात आली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद सोमवारीच्या सुमारास त्याच्या मित्रासह गुजर नगर परिसरात आला होता. तेव्हा जुगारातील उधारीच्या पैशावरून त्याचा रितेश शिवरेकर या तरुणासोबत वाद झाला. आनंदने रितेश शिवरेकरकडून १५ हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, ते त्याने वेळेत परत केले नव्हते. त्यामुळेच रितेश आणि आनंदमध्ये वाद सुरू होता. सोमवारी आनंद दिसताच रितेश आणि त्याच्या चार सहकाऱ्यांनी आनंदवर चाकू हल्ला करत त्याची हत्या केली.

या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी यश गोस्वामी आणि समिर शेडे या दोघांना अटक केली आहे. तर इतर आरोपी फरार आहेत.

Intro:
नागपुरातील कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत गुजर नगर परिसरात एका तरुणाची सोमवारी रात्री हत्या करण्यात आली...आनंद शिरपूरकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असे आहे....जुगारातील पैशाच्या आनंदची हत्या झाल्याची माहिती आहे,पण पोलीस यावर काहीही बोलायला तयार नाहीत
Body:आनंद शिरपूरकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून काल रात्री तो त्याच्या मित्रासह गुजर नगर परिसरात आला होता... तेव्हा जुगारातील (उधारीच्या) उसनवारीच्या पैशावरूनत्याचा रितेश शिवरेकर या तरुणासोबत वाद झाला... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद ने रितेश शिवरेकर याच्याकडून १५ हजार रुपये उसने घेतले होते... मात्र, ते त्याने वेळेत परत केले नव्हते... त्यामुळेच रितेश आणि आनंदमध्ये वाद सुरु होता.... काल आनंद दिसताच रितेश आणि त्याच्या चार सहका-यांनी आनंदवर चाकू हल्ला करत त्याची हत्या केली. याप्रकरणी कोतवाती पोलीस स्टेशन मध्ये हत्येचा गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी यश गोस्वामी आणि समिर शेडे या दोघांना अटक केली आहे. तर इतर आरोपी फरार आहे.... 

बाईट - ज्ञानेश्वर भोसले, पोलीस निरीक्षक, कोतवाली  Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.