ETV Bharat / state

Girl Died In Train Accident In Nagpur : अनेकांनी दिला आवाज मात्र हेडफोनने केला घात, रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

author img

By

Published : Jan 18, 2023, 7:17 PM IST

नागपुरातील डोंगरगाव येथे रेल्वे रूळ ओलांडताना तरूणीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. हेडफोन लावून रेल्वे रूळ ओलांडताना ही तरूणी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेनच्या खाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मृत विद्यार्थिनी आरती मदन गुरव (१९) ही हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथे मावशीकडे वास्तव्याला होती.

Young Woman Died in Train Collision
मृतक विद्यार्थिनी आरती मदन गुरव

नागपूर : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कानात हेडफोन लावून रेल्वेचा रुळ ओलांडने एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. नागपूर जवळील डोंगरगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. आरती मदन गुरव असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती भंडारा जिल्ह्यातील सातोना या गावची निवासी आहे. रेल्वे रूळ क्रॉस करत असताना कानात हेडफोन लावून असल्याने तिला समोरून भरधाव वेगात येत असलेली ट्रेनसुद्धा दिसली नाही. त्यामुळे तिचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही घटना आज घडली आहे.

हेडफोन लावणे जीवावर बेतले : मृत विद्यार्थिनी आरती मदन गुरव (१९) ही हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथे मावशीकडे वास्तव्याला होती. आरती गुरव डोंगरगाव जवळील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. आज सकाळी टाकळघाटवरून गुमगाव रेल्वे स्थानकाजवळ एसटी बसने आली. पायदळ रेल्वे स्थानकावर रेल्वे फटकावरून जात होती. यावेळी आरती मोबाईलवर हेडफोन लावून बोलत-बोलत जात होती. रेल्वे रूळ ओलांडून जात असताना भरधाव वेगात असलेल्या ट्रेनच्या समोर आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

अनेकांनी दिला आवाज मात्र हेडफोनने केला घात : आरती कॉलेजला जात असताना वाटेत रेल्वे ट्रॅक ओलांडून जावे लागते. आरती बसमधून उतरली तेव्हापासून मोबाईलवर बोलत चालली होती. ती बोलण्यात इतकी गुंग झाली होती की तिच्या बाजूने जाणाऱ्या गाडीचा आवाजसुध्दा तिला ऐकू येत नसावा. आरतीने बोलण्याच्या नादात रेल्वे ट्रॅक ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. त्या भागात असलेल्या अनेकांनी तिला आवाज देऊन थांबवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, आरतीच्या कानात हेडफोन लागले होते. त्यामुळे तिच्यापर्यंत कुणाचा आवाजच पोहचू शकला नाही.

नागपुरात अभियांत्रिकीचे शिक्षण : मृत आरती मदन गुरव ही अभ्यासात हुशार होती, त्यामुळे तिच्या पालकांनी इंजिनिअरिंगसाठी नागपूरला पाठवले होते. कॉलेज सुरू होऊन अवघे काही महिने झाले असता तिचा याप्रकारे मृत्यू झाल्याने टाकळघाटसह तिच्या गावी हळहळ व्यक्त केली जाते आहे.

पोलीस पथक घटनास्थळी दाखल : घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ यांच्यासह एक पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

प्रेमी युगुलाने केली होती आत्महत्या : गेल्यावर्षी 1 सप्टेंबर रोजी याच भागात एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केली होती. नागपूर-मुंबई रेल्वे लाईनवर जितेंद्र कांशीराम नेवारे आणि स्वाती बोपचे यांनी आत्महत्या केली होती. मृत स्वाती ही नात्याने त्याची पुतणी होती. त्यानंतर आता आरतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : Child Taken Out Of Grave In Lucknow : लखनऊमध्ये धक्कादायक घटना; चक्क मुलाला काढले कबरीतून बाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.