नागपूर - २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर नागपूर लोकसभा मतदारसंघात तरुण मतदारांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरुण मतदारांनी सर्व कामे बाजूला ठेऊन पहिल्यांदाच मतदानाचा अनुभव घेतला.
मतदान करण्यापूर्वी प्रचंड उत्सुकता असल्याचे मत तरुण मतदारांनी व्यक्त केले. नागपूर लोकसभा मतदारसंघातील लढत ही अंत्यत तुल्यबळ मानली जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले यांच्यात ही लढत होत आहे.