ETV Bharat / state

नागपूरमध्ये तरुणाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, भीशीचे पैसे परत करण्यात ठरला होता अपयशी - young man suicide in nagpur

लोकांकडून जमवलेले बीशीचे पैसे परत करण्यात अपयशी ठरलेल्या एक युवकाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना नागपूर शहरात घडली. आशिष उसरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. यासंदर्भात अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मृत आशिष उसरे
author img

By

Published : Aug 23, 2019, 5:26 PM IST

नागपूर - लोकांकडून जमवलेले भीशीचे पैसे परत करण्यात अपयशी ठरलेल्या एक युवकाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली. आशिष उसरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आर्थिक कोंडी झाल्यामुळे या तरुणाने शहरातील अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जयवंत नगर परिसरातील राहत्या घरी स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली. यासंदर्भात अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नागपूरमध्ये तरुणाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, भीशीचे पैसे परत करण्यात ठरला होता अपयशी

शहरातील कामठी परिसरात या तरुणाचे घर आहे. तेथे तो भीशी चालवण्याचा व्यवसाय करायचा. मात्र, अनेकांनी त्याचे पैसे बुडवल्याने त्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. लोकांनी गुंतवलेले पैसे देण्यास आशिष असमर्थ झाला, तेव्हा अनेकांनी त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचाही गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याने काही महिने कारागृहात देखील काढले होते.

कारागृहातून सुटल्यानंतर तो जयवंत नगर येथे राहत असताना देखील पैसे मागणारे त्याच्यापर्यंत पोहचले होते. त्यामुळे त्याची पुन्हा आर्थिक कोंडी झाली होती. याच विवंचनेतून त्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली. यासंदर्भात अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

Intro:लोकांकडून जमवलेले बीसीचे पैसे परत करण्यात अपयशी ठरलेल्या एक युवकाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे.....आशिष उसरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.... आर्थिक कोंडी झाल्यामुळे त्याने नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जयवंत नगर परिसरातील राहत्या घरी स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे..... अजनी पोलिसांनी या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे Body:आत्महत्या करणाऱ्या आशिष उसरे या तरुणाचे घर हे नागपूरच्या कामठी परिसरात आहे..... पैसे मागणाऱ्यांच्या तगाद्याला कंटाळून तो गेल्या दोन महिन्यांपासून तो अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जयवंत नगर परिसरातील भाड्याची खोली करून राहत असल्याची माहिती आहे.....आशिष हा कामठी परिसरात बीसी चालवण्याचा व्यवसाय करायचा,मात्र अनेकांनी त्याचे पैसे बुडवल्याने त्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.... लोकांनी गुंतवलेले पैसे देण्यास आशिष असमर्थ झाला तेव्हा अनेकांनी त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता,या गुन्हयात अटक झाल्यानंतर त्याने काही महिने कारागृहात देखील काढले असल्याची माहिती आहे....कारागृहातून सुटल्यानंतर तो जयवंत नगर येथे राहत असताना देखील पैसे मागणारे त्याच्या पर्यंत पोहचल्याने त्याची पुन्हा आर्थिक कोंडी झाली होती.... याच विवंचनेतून त्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे.... पोलिसांनी या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे

बाईट- हनुमंत उरलागोंडावर- पोलीस निरीक्षक-अजनी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.