ETV Bharat / state

पैशाच्या वादातून तरुणाने केली मित्राची हत्या; आरोपीला अटक - Murder in nagpur

तीन दिवसांपासून पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत लेडी डॉन म्हणून ओळख निर्माण करू पाहत असलेल्या पिंकी वर्मा नामक २३ वर्षीय तरुणीचा भररस्त्यात खून करण्यात आला होता. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्यानंतर आता जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुभम नावाच्या तरुणाची हत्या झाली आहे.

आरोपीला अटक
आरोपीला अटक
author img

By

Published : Apr 23, 2021, 5:39 PM IST

नागपूर - शहराच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. शुभम राजेश मसुरकर (२७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. तर रोहित मून असे आरोपीचे नाव आहे. मृतक शुभम आणि आरोपी रोहित यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणी संदर्भात वाद होता, त्यातून ही घटना घडल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम आणि रोहित यांना नशा करण्याची सवय होती. ही सवय भागवण्यासाठी दोघेही चोऱ्या आणि लुटमारीच्या घटना एकत्रच करायचे. काही महिन्यांपूर्वी आरोपी रोहितने नशा करण्यासाठी शुभमला साडे चार हजार रुपये उधार दिले होते. पैसे परत मिळावे या करिता रोहित शुभम कडे वारंवार तगादा लावत होता, मात्र शुभम टाळाटाळ करत असल्याने रोहित संतापलेल्या होता. त्यातून काल रात्री झालेल्या वादातून रोहिने शुभमच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केला. घटनेची माहिती समजताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळ गाठून तापस सुरू केला. तेव्हा रोहित मून हे नाव पुढे आले. पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली आहे. रोहितच्या एका साथीदाराला देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र घटनेच्या वेळी तो अन्य ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला सोडून देण्यात आले आहे.

तीन दिवसात दोन खुनाच्या घटना

तीन दिवसांपासून पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत लेडी डॉन म्हणून ओळख निर्माण करू पाहत असलेल्या पिंकी वर्मा नामक २३ वर्षीय तरुणीचा भररस्त्यात खून करण्यात आला होता. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्यानंतर आता जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुभम नावाच्या तरुणाची हत्या झाली आहे, याही प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.