नागपूर - आज जागतिक योग दिन देशभरात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने महानगरपालिका आणि जनार्धन स्वामी योगअभ्यासी मंडळातर्फे योगासन अभ्यासाने आयोजन करण्यात आले होते. या योगअभ्यासात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले होते.
भारतीय योग आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे योगाच्या प्रचारात मदत मिळते असल्याने निरोगी आणि सुदृढ जीवनशैली जगण्याकरता प्रत्येकाने दररोज योग केला पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नितीन गडकरी प्रत्येक वर्षी आयोजित होत असलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतात. त्यांनी आपल्या जीवन शैलीत योग साधनेला सहभागी केलेले आहे. त्यांच्या दिवसाची सुरुवात योग केल्यानंतरच होत असते त्यामुळे योग अभ्यासाच्यासंदर्भात त्यांचा अभ्यास दांडगा आहे.