नागपूर : हा प्रकार कळमना परिसरात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यं संबंधित असलेल्या दाम्पत्याला दोन मुली आहे. यातील पती हा भाजी विक्रीचा व्यवसाय करायचा तर पत्नी ही एका ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. त्यामुळे पती नेहमीच तिच्या चारित्र्यावर संशय घेत भांडण करायचा आणि यावरूनच तो नेहमीच मारहाण देखील करायचा. कालसुद्धा याच कारणाने त्यांच्यात भांडण सुरू झाले होते. रागाच्या भरात आरोपीने घरातल्या वस्तूंनी तिच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे पत्नी रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी अटक केली आणि तपासाला सुरुवात केली आहे.
होळीच्या दिवशी केली होती तक्रार : रंगपंचमीच्या दिवशी आरोपी पतीने पत्नीसोबत भांडण सुरू केले होते. चारित्र्याचा संशय घेत आरोपीने तिला मारहाण देखील केली होती. मात्र, होळीचा दिवस असल्याने पत्नीने वाद न घातला थेट पोलीस ठाण्यात जाऊन पतीची तक्रार दिली होती. या गोष्टीचा राग मनात धरून काल पतीने पत्नीची हत्या केल्याचे बोलले जाते आहे.
नागरिकांमध्ये रोष : मृतक महिलेने होळीच्या दिवशी आरोपी पती विरुद्ध तक्रार दिली होती. तरी देखील कळमना पोलिसांनी आरोपी विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळेच पत्नीला आपला जीव गमवावा लागलेला असल्याचा आरोप ती राहत असलेल्या परिसरातील लोकांनी केला आहे.
तीन दिवसात दोन हत्या : गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात गुन्हे घटलेले दिसत असताना गेल्या तीन दिवसात दोन हत्या झाल्या आहेत. होळी, रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरात तगडा बंदोबस्त असल्याने कोणत्याही गटात राडा झाला नाही. मात्र तीन दिवसात दोन हत्येच्या घटना घडल्या आहेत. यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूच्या वादातून एका आरोपीने जबर मारहाण करुन मित्राची हत्या केली आहे.