नागपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पक्षाचा झेंडा बदलून त्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा वापरली आहे. याप्रकरणी मनसेवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज राजे मुधोजी भोसले यांनी सांगितले.
मनसेने राजकीय अजेंडा बदलून हिंदुत्वाचा स्वीकार केला. यानंतर पक्षाचा झेंडासुद्धा बदलण्यात आला आहे. बदललेल्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमुद्रा असल्याने यावर नवा वादंग निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्याही पक्षाने आपल्या स्वार्थासाठी उपयोगात आणणे चुकीचे असल्याचे मुधोजी भोसले म्हणाले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाला संजीवनी देण्यासाठी राजमुद्रेचा उपयोग करत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. या संदर्भात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे देखील राजे मुधोजी भोसले म्हणाले आहेत.
हेही वाचा - 'मनसे सर्व धर्मांना एकत्रित घेत वाटचाल करेल'