ETV Bharat / state

नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर मोठी गळती; २४ तासांचा शटडाऊन - नागपूर पाणीपुरवठा बातमी

२ सप्टेबर रोजी सकाळी १० ते ३ सप्टेंबर सकाळी १० दरम्यान नागपूर शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोनमध्ये पुढील काही दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

nagpur water supply news
nagpur water supply news
author img

By

Published : Sep 1, 2021, 1:39 AM IST

नागपूर - जिल्ह्यातील कन्हान जलशुद्धीकरण केंद्रावरून नागपूर शहराकडे येणाऱ्या 1300 मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर उद्भवलेल्या मोठी गळतीची दुरुस्ती करण्यासाठी २४ तासांचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. २ सप्टेबर रोजी सकाळी १० ते ३ सप्टेंबर सकाळी १० दरम्यान नागपूर शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोनमध्ये पुढील काही दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

प्रतिक्रिया

टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार नाही -

पिवळी नदी येथील उद्भवलेली ही मोठी गळती दुरुस्त करणे तसेच सक्करदरा टाकीवर तांत्रिक काम आणि बाबुलवन टाकीवर फ्लोमीटरची जोडणी करणे अत्यंत आवश्यक आहे. या शटडाऊन कालावधी दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील सर्व नागरिकांनी दैनंदिन वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून घ्यावा, असे आवाहनही पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

या भागाचा पाणीपुरवठा बाधित राहील -

  • आशी नगर झोन : बेझनबाग जलकुंभ, बिनाकी एग्झीस्टिंग, बिनाकी, इंदोरा १ व २, गमदूर डायरेक्ट टेपिंग, आकाशवाणी डायरेक्ट टेपिंग, जसवंत टॉकीज डायरेक्ट टैपिंग
  • सतरंजीपुरा झोन : बस्तरवारी १ , २ अ व ख, शांती नगर जलकुंभ, वांजरी (विनोबा भावे नगर) इटाभट्टी डायरेक्ट टॅपिंग
  • नेहरू नगर झोन : नंदनवन (जुने) जलकुंभ , नंदनवन १ व २ , सक्करदरा १ , २ व ३ , ताजबाग व खरबी जलकुंभ
  • लकडगंज झोन : भांडेवाडी, देशपांडे लेआऊट (भरतवाडा), लकडगंज, मिनिमाता नगर, सुभान नगर, कळमना, पारडीवर जलकुंभ अश्या २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.

हेही वाचा - ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका नको, राष्ट्रवादीची भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.