ETV Bharat / state

दुष्काळात तेरावा... जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया - शाखा

पाईपलाईन फुटल्याने शेजारी असलेल्या बॅंक ऑफ इंडियाची शाखा आणि बेसा येथील एटीएममध्येही पाणी शिरले आहे. पाईपलाईन फुटलेल्या परिसरात तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जलवाहिनी फुटल्याने वाया गेलेले पाणी.
author img

By

Published : Jun 11, 2019, 5:21 PM IST

नागपूर - येथील धरणांमधील पाण्याचा साठा तळाला गेला आहे. अशा परिस्थितीमध्येच आज शहरातील बेसा परिसरात पाईपलाईन फुटली आणि यामध्ये लाखो लिटर्स पाणी वाया गेले आहे. जिल्ह्याला पाणी पुरवठा करणे प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे. नागपूर शहरात देखील पाण्याची भीषण टंचाई आहे, असे असताना 'दुष्काळात तेरावा महिना' अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. सध्या नागपूरकरांना रोज १०० एमएलडी कमी पाणीपुरवठा केला जात आहे.

जलवाहीनी फुटल्यामुळे 5 ते 6 लाख लीटर पाणी वाया गेल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.

नाली खोलीकरण करत असताना बेसा परिसरातील ही पाईपलाईन फुटली. आणि लाखो लिटर्स पाणी परिसरात शिरले आहे. ही पाईपलाईन फुटल्याने शेजारी असलेल्या बॅंक ऑफ इंडियाची शाखा आणि बेसा येथील एटीएममध्येही पाणी शिरले आहे.

पाईपलाईन फुटलेल्या परिसरात तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ५ ते ६ लाख लिटर पाणी वाया गेल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शिंनी वर्तवला आहे. पाणी वाया जात असताना बेसा ग्रामपंचायतीतर्फे कोणतीही तत्काळ उपाययोजना केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Intro:दुष्काळात तेरावा महिना जलवाहिनी फुटली....लाखो लिटर पाणी वाया

धरणांन मधील पाणी साठा तळाला गेला असताना जिलह्याला पाणी पुरवठा करणे प्रशासन साठी आव्हान आहे नागपूर शहरात देखील पाण्याची भीषण टंचाई आहे, नागपूरकरांना रोज १०० एमलडी कमी पाणीपुरवठा केला जातो, यातच आज शहरातील बेसा परिसरात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर्स पाणी वाया गेलंय, नाली खोलीकरण करत असताना बेसा परिसरातील पाईपलाईन फुटली आणि लाखो लिटर्स पाणी परिसरात शिरलं. Body:ही पाईपलाईन फुटल्याने शेजारी असलेल्या बॅंक आॅफ इंडियाची शाखा आणि बेसा येथील एटीएममध्येही पाणी शिरलंय. पाईपलाईन फुटलेल्या परिसरात तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता वर्तविली जातेय. ५ ते ६ लाख लिटर पाणी वाया गेल्याचा अंदाज प्रत्यक्षर्थी नि वर्तविलाय... पाणी वाया जात असताना बेसा ग्रामपंचायती तर्फ़े कुठंक्याही तात्काळ उपायजोजना केल्या नसल्याचं आरोप नागरिकांनि केलाय

बाईट- नागरिक
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.