नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपाशी हातमिळवणी केली. अशा परिस्थितीत आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोबत आले तरच अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांसमोर ठेवल्याचा खळबळजनक दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
शरद पवारांची भाजपाला गरज : भाजापकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय कृषीमंत्री पदाची ऑफर असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यावर बोलताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना अनुभव आहे. त्या आधारावर त्यांनी वक्तव्य केले असेल, असे वडेट्टीवार म्हणाले. दोन पक्ष सोबत आल्यानंतरही भाजपाची परिस्थिती सुधारत नाही. त्यामुळे अजित पवार हे शरद पवार यांना भेटत आहे. मास लीडर शरद पवारांची भाजपाला गरज आहे. त्यांची मदत मिळाल्याशिवाय लोकसभेतील आकडा वाढू शकत नाही. त्यामुळे अजित पवार हे शरद पवार यांना भेटत आहे.
आम्ही महाविकास आघाडीत एकत्र आहोत. शरद पवार हे सोबत आहेत. आज त्यांच्या भाषणाची प्रतीक्षा करू. आजच्या भाषणातून कुठल्या दिशेने त्यांचा विचार आहे, ते दिसेल. लवकरच हा संभ्रम दूर होईल आणि महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीला समोर जाईल-विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
नवाब मलिक यांना जामिन : ईडीने नवाब मलिक यांच्या जामीनाला विरोध केला होता. मात्र, आरोग्याच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळाला. मध्यंतरी नवाब मलिक यांच्या मुली अजित पवार यांना भेटल्याची माहिती आहे. त्यातून कदाचित त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग सुकर झाला असेल. भारतीय जनता पक्ष कोणत्या खालच्या स्तरावर जाईल, या प्रश्नाचे उत्तर नवा मलिक यांच्या निर्णयानंतर आम्ही देऊ, असे ते म्हणाले आहेत. 'मी तोंड उघडले तर पळता भुई कमी पडेल, अशी धमकी प्रफुल पटेल द्यायचे. मात्र, त्यांचे आताचे वक्तव्य पाहता ते हास्य जत्रेसारखे वाटत आहे, असेही ते म्हणाले.
सरकारवर किती विश्वास ठेवायचा : मागील वर्षी रायगडमध्ये देखील अशाच पद्धतीचे दरड कोसळली होती. त्या ठिकाणी 247 घरे उद्धवस्त झाली होती. अनेकांचा मृत्यू झाला. पण त्या ठिकाणी कोरोना संपल्यानंतर सरकार आल्यानंतर सुद्धा 84 घरे बांधून देण्यात आली आहेत. त्यामुळे इरसाळवाडीच्या सरकारच्या वक्तव्यावर किती विश्वास ठेवायचा, ते येणाऱ्या काळात कळेल, असे ते म्हणाले. शरद पोंक्षे हा माणूस राष्ट्रपिताचा खून करण्याचा धाडस करणाऱ्या व्यक्तीचे समर्थन करतो, त्याला उत्तर देण्याची गरज नाही, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.
हेही वाचा :