ETV Bharat / state

Vijay Wadettiwar : उद्धव ठाकरे अन् अजित पवारांच्या सभांची विजय वडेट्टीवारांनी केली तुलना; म्हणाले... - Uddhav Thackeray meeting alive

अलीकडेच राज्यात उद्धव ठाकरे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या सभा झाल्या. यापैकी उद्धव ठाकरे यांच्या सभेत जिवंतपणा होता तर अजित पवार यांच्या सभेत मुर्दाडपणा होता. किंबहुना अजित पवारांच्या सभेत बळजबरीने लोक आणण्यात आले होते, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. (Opposition leader Vijay Wadettiwar) (Vijay Wadettiwar criticizes Ajit Pawar) (Wadettiwar On Uddhav Thackeray) (Wadettiwar On Ajit Pawar)

Wadettiwar On Uddhav Thackeray
विजय वडेट्टीवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 5:26 PM IST

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

नागपूर : अजित पवारांच्या कालच्या सभेत बळजबरीने लोक आणण्यात आले होते. उलट उद्धव ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता. तर अजित पवारांच्या सभेत मुर्दाडपणा होता, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. लोक जनतेला काय सांगणार? बेईमानी केली, पक्ष फोडला, जनतेसोबत दगाबाजी केली, हे सांगणार का? हे जनतेला दिसते आणि ते विश्वास ठेवायला तयार नाही. जनतेने निर्णय घेतला आहे की, यांची आता जिरवायची. (Uddhav Thackeray meeting alive) (Ajit Pawar meeting dull) (Opposition leader Vijay Wadettiwar) (Wadettiwar criticism of Ajit Pawar) (Wadettiwar On Uddhav Thackeray) (Wadettiwar On Ajit Pawar)

प्रफुल्ल पटेलांवरही टीका : प्रफुल्ल पटेल कशाच्या भरवश्यावर असं म्हणत आहे की, निवडणूक आयोग काय निर्णय देणार आहे. निर्णय गुप्त पद्धतीने झाला असेल आणि तो निर्णय प्रफुल्ल पटेल यांना माहीत असेल. म्हणून ते तसे बोलत आहेत का? असा थेट प्रश्न विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे. ते नागपूर येथील निवासस्थानी बोलत होते. निवडणूक आयोगाने तर आधीच विश्वास गमावला आहे. पक्ष बळकावण्याचा प्रयत्न आहे आणि तो केंद्र सरकारच्या आशीर्वादाने होत आहे आणि तोच विश्वास प्रफुल पटेल यांना आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

निधी वरून एकमेकांचे कपडे फाडतील : शिंदे-फडणवीस सरकार असताना आमच्या आमदारांना निधी मिळत नव्हता. आता अजित पवार अर्थमंत्री झाले असताना, फक्त काँग्रेसचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे आमदार यांच्या मतदारसंघात निधीला स्थगिती आहे. त्यामुळे या सरकार मधील तीनही पक्षात निधीसाठी हावरटपणा सुरू आहे. त्यांच्यात आपापसात भांडण दिसून येत आहे. भविष्यात हे एकमेकांचे कपडे फाडतील, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

सना खान प्रकरणात पोलिसांवर आरोप : सना खान प्रकरणात लपवा-लपवी सुरू आहे. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात नागपूरचे कनेक्शन फार मोठे आहे. अनेक लोकांचे त्यामध्ये कनेक्शन आहे, त्यांचा खुनामध्ये सहभाग नसला, तरी सना खानचा वापर अनेक दृष्टीने अनेकांनी केलेला आहे, हे तपासात येईल. याप्रकरणी दिशा भरकटवण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. जे सूत्रधार आहे, जे बदनाम आहेत त्यांना वाचवण्यासाठी हे सर्व होत आहे.

तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करा : कोकण वगळता पूर्ण महाराष्ट्रभर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपाचे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार, शेतकऱ्यांचे हाल होणार, हे दिसत आहे. मात्र शासन सभा, प्रति सभा, उत्तर, प्रतिउत्तर यामध्येच अडकलेले आहे. शेतकऱ्यांची थोडीही काळजी असेल तर त्याकडे लक्ष द्या. नाहीतर शेतकरी तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही. तातडीने दुष्काळ जाहीर करावा. रबी हंगामाच्या अनुषंगाने बी बियाणे खत अशी तयारी सरकारने सुरू केली पाहिजे. शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज द्यावेच लागेल, असे मत विजय वडेट्टीवारांनी मांडले.

हेही वाचा:

  1. Praful Patel : राष्ट्रवादी पक्ष फुटला? प्रफुल पटेल यांनी थेटच सांगितलं...
  2. Dhananjay Munde : शरद पवारांनी बीड जिल्ह्याला काय दिलं? धनंजय मुंडेंचा सवाल
  3. Sharad Pawar : शरद पवारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'त्या' कामाचं कौतुक; म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.