ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक: नागपूरमध्ये भाजपच्या गडाला काँग्रेस देणार का हादरा?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरात भाजपने 2014 सालच्या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस अजूनही गटबाजीच्या फासात अडकल्याने विखुरलेल्या परिस्थितीतून सावरलेला नाही. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक काँग्रेससाठी जड जाणार हे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Sep 18, 2019, 8:24 PM IST

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरात भाजपने 2014 सालच्या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस अजूनही गटबाजीच्या फासात अडकल्याने विखुरलेल्या परिस्थितीतून सावरलेला नाही. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक काँग्रेससाठी जड जाणार हे स्पष्ट झाले आहे. शिवसेना राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन पक्षाचा फारसा प्रभाव शहरात नसल्याने भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यातच सामना रंगणार आहे.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. नागपूर शहरात प्रचाराच्या रणधुमाळीला देखील सुरूवात झाली आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रचाराचा कार्यक्रम राबवायला सुरूवात केली आहे. ज्यामध्ये पहिल्या टप्यात कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेतल्या जात असून, विधानसभानिहाय कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जात आहे. ज्याच्या निष्कर्षातून शहरातील काही उमेदवारांचे तिकीट कापले जाण्याची दाट शक्यता आहे. नागपूर शहरात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या सर्व सहाच्या सहा मतदारसंघावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे.

नागपूर विधानसभा निवडणूक

दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे नेतृत्व स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. तर कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे सारखे अनुभवी आमदार आहेत. तर डॉ. मिलिंद माने आणि सुधाकर कोहळे यांच्यासारखे नवखे आमदार देखील आहेत. ज्यापैकी मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारी, पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख आणि दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांची उमेदवारी धोक्यात असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष यावेळी जुन्या उमेदवारांवर डाव खेळेल की नव्या उमेदवारांना संधी देईल यावरदेखील काँग्रेसचे यश अवलंबून रहाणार आहे.

सलग दोन वेळा पराभवाची चव चाखलेल्या उमेदवारांना यावेळी संधी देऊ नका, असा काँग्रेसमधून सूर उमटत आहे. कोणत्या उमेदवाराला संधी मिळेल हेदेखील बघणे तेवढेच महत्त्वाचे आहे. सध्या नागपुरात माजी खासदार विलास मुत्तेमवारांसह नितीन राऊत आणि नुकतेच निलंबन रद्द करून काँग्रेसमध्ये पुनरागमन करणारे सतीश चतुर्वेदी यांचे गट सक्रिय आहेत. या गटातटाच्या राजकारणामुळे नागपुरात काँग्रेस पक्ष भाजपसमोर टिकाव धरेल का हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी पक्षाला एकसंघ करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, निवडणुकीत अपयश आल्यानंतर तेदेखील नागपूर शहर काँग्रेसच्या कारभारापासून दूर असल्याचे चित्र बघायला मिळते आहे. याशिवाय नागपूर शहरात शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीसारख्या पक्षांचा प्रभाव शून्य आहे. शिवसेना पूर्व किंवा दक्षिण नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक असली तरी भाजप त्यांना कुठल्याही परिस्थितीत या जागा सोडणार नाही असं सध्या दिसतयं. तर वंचित बहुजन आघाडी किती मतांची मजल मारेल यावरसुद्धा काँग्रेसच्या गोळा बेरजेचे राजकारण अवलंबून असणार आहे.

Intro:*सूचना* ही स्पेशल स्टोरी सन्मानीय राजेंद्र साठे सरांच्या आदेशा नंतर पाठवलेली आहे....राज्यात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ही स्टोरी लावायची आहे,कृपाय याची नोंद घ्यावी
--------------------------------------
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरात भारतीय जनता पक्षाने 2014 सालच्या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी कंबर कसली आहे,तर दुसरीकडे देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस अजूनही गटबाजीच्या फासात अडकल्याने विखुरलेल्या परिस्थितीतुन सवरलेला नाही,त्यामुळे ही विधानसभा निवडणूकीत काँग्रेस साठी जड जाणार हे स्पष्ट झाले आहे...शिवसेना राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन पक्षाचा फारसा प्रभाव शहरात नसल्याने भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यातच सामना रंगणार आहे

Body:विधानसभा निवडणुकीचे बिघुल वाजला आहे.. नागपूर शहरात प्रचाराच्या रणधुमाळीला देखील सुरवात झाली आहे...भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर अतिशय नियोजन बद्ध पद्धतीने प्रचाराचा कार्यक्रम राबवायला सुरवात केली आहे,ज्यामध्ये पहिल्या टप्यात कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेतल्या जात असून विधानसभा निहाय कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जात आहे,ज्याच्या निष्कर्षातून शहरातील काही उमेदवारांचे तिकीट कापले जाण्याची दाट शक्यता आहे...नागपूर शहरात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत,त्या सर्व सहाच्या सहा वर भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे...या मध्ये दक्षिण-पश्चिम मतदार संघाचे नेतृत्व स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात,तर कृष्णा खोपडे,सुधाकर देशमुख,विकास कुंभारे सारखे अनुभवी आमदार आहेत तर डॉक्टर मिलिंद माने आणि सुधाकर कोहळे यांच्या सारखे नवखे आमदार देखील आहेत...ज्या पैकी मध्य नागपुर चे आमदार विकास कुंभारी पश्चिम नागपूर चे आमदार सुधाकर देशमुख आणि दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांची उमेदवारी धोक्यात असल्याचं राजकीय विश्लेषक सांगताहेत तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष यावेळी जुन्या उमेदवारांवर डाव खेळेल की नव्या उमेदवारांना संधी देईल यावरदेखील काँग्रेसच यश अवलंबून रहाणार आहे सलग दोन वेळा पराभवाची चव चाखलेल्या उमेदवारांना यावेळी संधी देऊ नका असा काँग्रेसमधून सूर उमटत असल्यामुळे कोणत्या उमेदवाराला संधी मिळेल हेदेखील बघणे तेवढेच महत्त्वाचे आहे सध्या नागपुरात माजी खासदार विलास मुत्तेमवार सह नितीन राऊत आणि नुकतेच निलंबन रद्द करून काँग्रेसमध्ये पुनरागमन करणारे सतीश चतुर्वेदी यांचे गट सक्रिय आहे या गटातटाच्या राजकारणामुळे नागपुरात काँग्रेस पक्ष भाजप समोर टिकाव धरेल का हेदेखील बघणे महत्त्वाचे सर्वात महत्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी पक्षाला एकसंघ करण्याचा प्रयत्न केला मात्र निवडणुकीत अपयश आल्यानंतर तेदेखील नागपूर शहर काँग्रेस च्या कारभारा पासून दूर असल्याचं चित्र बघायला मिळते आहे...या शिवाय नागपूर शहरात शिवसेना ,राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी सारख्या पक्षांचा प्रभाव शून्य आहे....शिवसेना पूर्व किव्हा दक्षिण नागपूर मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक असली तरी भाजप त्यांना कुठल्याही परिस्थितीत या जागा सोडणार नाही असं सध्या चित्र दिसून येत आहेत,तर वंचित बहुजन आघाडी किती मतांची मजल मारेल यावर सुद्धा काँग्रेस च्या गोळा बेराजचे राजकारण अवलंबून असणार आहे

Conclusion:एकंदरीत नागपूर शहरातील परिस्थिती भारतीय जनता पक्षा साठी परिस्थिती अनुकूल असली तरी anti-incumbency फटका भाजपला बसू शकतो तर काँग्रेस भाजपच्या अपयशाचे गोडवे जनतेसमोर गाऊनलोकांचे मत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे

बाईट- भुपेंद्र गणवीर,राजकीया विश्लेषक

*सूचना* ही स्पेशल स्टोरी सन्मानीय राजेंद्र साठे सरांच्या आदेशा नंतर पाठवलेली आहे....राज्यात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ही स्टोरी लावायची आहे,कृपाय याची नोंद घ्यावी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.