ETV Bharat / state

विदर्भवादी नेते लढवणार विधानसभेच्या ४० जागा

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा विदर्भवादी नेते विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. विदर्भातील 62 पैकी 40 जागांवर निवडणूक लढणार असल्याचा निर्णय विदर्भवाद्यांनी घेतला आहे.

विदर्भवादी नेते लढवणार विधानसभा
author img

By

Published : Sep 4, 2019, 10:20 PM IST

नागपूर - लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा विदर्भवादी नेते विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. विदर्भातील 62 पैकी 40 जागांवर निवडणूक लढणार असल्याचा निर्णय विदर्भवाद्यांनी घेतला आहे. त्यापैकी 4 जागांवरचे उमेदवार जाहीरही करण्यात आले आहेत.

या निवडणुकीत विदर्भवादी वेगळ्या विदर्भाचे आंदोलन म्हणून लढणार असल्याचे सांगत आहेत. वेगळ्या विदर्भ राज्याच आंदोलन फार जुने असलं तरी अद्याप वेगळं राज्य झालेलं नाही. किंबहुना तसं वातावरण तयार करण्यात विदर्भवादी कमी पडत आहेत. वेगळ्या विदर्भासाठीआंदोलने करूनही काही निर्णय होत नाही. त्यामुळे आता विदर्भ राज्य आघाडीचे नेते निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्याकरिता विदर्भवाद्यांनी विदर्भातील 40 जागेवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. 40 पैकी 22 जागा विदर्भ राज्य आंदोलन समिती लढवणार आहे, तर इतर १८ जागांवर विदर्भ समर्थक पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे.

विदर्भवादी नेते लढवणार विधानसभेच्या ४० जागा

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार वामनराव चटप निवडणूक लढणार आहेत. तर नागपूरच्या सावनेरमधून अरुण केदार लढणार आहेत. या शिवाय यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव आणि वाशीम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघातून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. विदर्भवादी शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगार, वीज आणि विदर्भावर होणार अन्याय हे मुद्दे पुढे आणण्याच्या तयारीत आहेत. मात्र, विदर्भवादी निवडणुकीत किती ताकत पणाला लावतील हे सांगणे कठीण आहे.

Intro:नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्या नंतर पुन्हा एकदा विदर्भवादी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.... विदर्भवादी विदर्भातील 62 पैकी ४० जागा वर निवडणूक लढणार असल्याचा निर्णय घेतला आहे,त्यापैकी चार जागी उमेदवार जाहीर करण्यात सुद्धा त्यांनी आघाडी घेतली ... या निवडणुकीला विदर्भवादी वेगळ्या विदर्भाचं आंदोलन म्हणून लढणार असल्याचं सांगत आहेत Body:वेगळ्या विदर्भ राज्यच आंदोलन फार जूने असलं तरी अद्याप वेगळं राज्य काही झालेलं नाही,किंबहुना तसं वातावरण तयार करण्यात विदर्भवादी कमी पडत आहेत...वेगळ्या विदर्भाच्या नावावे आंदोलने करून थकल्यानंतर जनता दरबारी काहीही होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता विदर्भ राज्य आघाडीचे नेते निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत...त्या करिता विदर्भवाद्यांनी विदर्भातील ४० जागेवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे....40 पैकी 22 जागा विदर्भ राज्य आंदोलन समिती लढवणार आहे,तर इतर विदर्भ समर्थक पक्ष 18 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत...चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातुन माजी आमदार वामनराव चटप निवडणूक लढणार हेत तर नागपूरच्या सावनेर मधून अरुण केदार लढणार आहेत ...या शिवाय यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव आणि वाशीम जिल्ह्यातील रिसोड मतदार संघातून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत...विदर्भवादी शेतकऱ्यांचे प्रश्न , रोजगार,वीज आणि विदर्भावर होणार अन्याय हे मुद्धे प्रामुख्याने पुढे आणण्याच्या तयारीत आहे,मात्र विदर्भवाद्यां निवडणुकीत किती ताकत पणाला लावतील हे सांगणे कठीण आहे..या शिवाय विदर्भातील जनतेला विदर्भवादी आपले मुद्दे कशे पटवून देतील यावर सुद्धा त्यांचे यश अवलंबून राहील ..

बाईट -- राम नेवले --- संयोजक -- विदर्भ राज्य आघाडी
बाईट -- अरुण केदार -- सावनेर उमेदवार

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.