ETV Bharat / state

महाराष्ट्र दिनीच विदर्भवाद्यांची महाराष्ट्रापासून वेगळी होण्याची मागणी, सरकारच्या विरोधात आंदोलन - महाराष्ट्र दिन आंदोलन न्यूज

महाराष्ट्र दिनीच नागपुरात विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी होत आहे.

nagpur
नागपूर
author img

By

Published : May 1, 2021, 8:27 PM IST

नागपूर - महाराष्ट्र दिन आज (1 मे) सर्वत्र साजरा करण्यात आला. पण, महाराष्ट्र दिनीच नागपुरात विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. इतवारी भागातील विदर्भ चंडिका मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. वेगळ्या विदर्भाची मागणी करत दरवर्षी महाराष्ट्र दिनी विदर्भवादी काळा दिवस म्हणून पाळतात आणि आंदोलने करतात.

महाराष्ट्र दिनीच विदर्भवाद्यांची महाराष्ट्रापासून वेगळी होण्याची मागणी

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मोजक्याच युवा कार्यकर्त्यांनी विदर्भ चंडिका मंदिरासमोर महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणा दिल्या. महाराष्ट्र सरकारचा निषेध केला आणि वेगळ्या विदर्भाची मागणी केली. दरम्यान, या आंदोलनाला मोजक्याच लोकांची उपस्थिती होती. तरीही नागपुरात कोरोनाचा वाढता प्रकोप आणि लॉकडाऊनमधील निर्बंधांचे उल्लंघन करत विदर्भवाद्यांनी निर्दशन केले. त्यामुळे आता पोलीस त्यांच्या विरोधात काय कारवाई करतील? याकडे लक्ष लागले आहे.

वेगळ्या विदर्भाची अनेक वर्षांची मागणी

विदर्भाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन देऊन विदर्भातील ११ जिल्हे महाराष्ट्रात सामील करून घेण्यात आले होते. त्यावेळी वर्षातील एकतरी विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरात घेण्याचा ठराव नागपूर करारानुसार निश्चित झाला होता. मात्र, पुढील काळात विदर्भ विकासाच्या शर्यतीत मागे पडत राहिल्याने अनेक बाबींचा अनुशेष वाढत गेला. त्यामुळे गेल्या अनेक दशकांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी विदर्भवाद्यांकडून केली जात आहे. त्याकरिता 1 मे या महाराष्ट्र दिनी विदर्भवादी महाराष्ट्र शासनाचा निषेध करतात.

हेही वाचा - आजपासून महापालिकेच्या ५ केंद्रांवर १८ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण; नोंदणी केलेल्यांनाच प्राधान्य

हेही वाचा - महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले हुतात्म्यांना अभिवादन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.