नागपूर - यवतमाळच्या पांढरकवडाच्या जंगलात अवनी (टी १) या वाघिणीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. या प्रकरणात शिकारी शफत अली खान यांनी टी 1 वाघिणीला मारण्याचा कट हा दोन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा होता, असे नागपूर खंडपीठात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. वन्यजीव प्रेमी सरिता सुब्रमण्यम यांनी अवनीसंबंधी एक याचीका दाखल केली होती. त्यावर सदर शिकाऱ्याने न्यायालयाला प्रतिज्ञापत्र दिले.
हेही वाचा - मागील चार वर्षात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात २१४ लोकांचा मृत्यू
यात पशुवैदकीय अधिकाऱ्यांनी अवनीला पकडण्याचे इतर पर्याय फोल ठरत असल्याने काही वर्षांपूर्वी करण्यात आलेला प्रयोग करण्याची कल्पना पुढे आणली. यात ही संकल्पना अशी होती की, महाराज बाग मधील वाघिणीचे मूत्र हे अवनी वाघीण असणाऱ्या क्षेत्रात फवारणी केल्यास ती बाहेर पडून तिला पकडण्यासाठी किंवा हाती लागत नसल्याने बाहेर काढण्यासाठी हा प्रयोग करण्याचे ठरले. यात हा प्रयोग यशस्वी झाला.
प्रतिज्ञापत्रात पथकाच्या बचावासाठी गोळी मारल्याचा उल्लेख..
मूत्र फवारणीनंतर अवनी स्वतःच्या पिल्लांना असुरक्षित समजू लागली होती. दुसरी वाघीण असण्याचा भास असल्याने व असुरक्षित समजू लागल्याने अवनी वाघीण ही एकाच रस्त्यावर दबा धरून राहायची. जेव्हा दिसली तेव्हा बेशुद्ध करण्यासाठी डॉट मारला. पण, डॉट मारल्यानंतर बेशुद्ध व्हायला किमान 10 ते 15 मिनिटांचा कालावधी लागतो. या दरम्यान ती अधिकच चवताळली. यावेळी पथकातील सर्व जण हे खुल्या जिप्सीत होते. तिने हल्ला केल्याने वाहन चालक घाबरला होता. वाहन रस्त्याखाली उतरले होते. जिप्सीतील शिकारी आणि अवनीचे अंतर हे पाच ते सात मीटर असल्याने स्वतःचा आणि पथकातील इतरांचा जीव वाचवण्यासाठी तिला ठार मारावे लागले असल्याचे शिकारी शफत अली खान (वय 63, रा. हैदराबाद) यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले.
अवनी वाघीण ही नरभक्षक झाली होती आणि तिने 13 जणांचा बळी घेतला, असा ठपका ठेवत मारण्याचे आदेश निघाले. पण, सुरुवातीला तिच्या दोन पिल्लांना पकडून बचाव केंद्रात दाखल करावे, त्यानंतर अवनीला बेशुद्ध करून पकडण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना होत्या. यात अखेर पकडण्याचे सर्व प्रयत्न फसल्यास मनुष्यहानी होऊ नये म्हणून मारण्यात यावे, असे आदेश देत नियम अटी पालन करण्याचे सगण्यात आले होते.
युरिन फवारणीचा निर्णय केव्हा घेण्यात आला..
अवनीला पकडण्यासाठी पॅराग्लायडिंग, हत्तीवर बसून शोधमोहीम, तसेच शिकारी कुत्रे, शिकार बांधून अडकवण्याचा प्रयत्न केला. डुक्कर, खच्चर घोडा असेही प्राणी बांधून अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्व प्रयोग दोन महिने चालले. ते अयशस्वी ठरले. त्यामुळे, २००८-०९ मध्ये वन विभागातील वाघाची युरिन वापरून राणमंगली परिसरात जो प्रयोग करण्यात आला होता, तोच प्रयोग अवनीला पकडण्यासाठी करण्यात आला. दोन पशुवैदकीय अधिकाऱ्यांनी अवनीला पकडण्यासाठी महाराज बाग येथील वाघिणीच्या मूत्राची फवारणी केली.
याचिकाकरत्या वन्यप्रेमी सरिता सुब्रमण्यम यांनी याचिका दाखल करत अवनीच्या दोन पिल्लांना पकडून पुनर्वसन करण्यात यावे. खासगी शिकारी शफत अली खान, असगर अली खान, मुखबिर शेख, पशुवैदकीय अधिकारी डॉ. बी.एम कडू यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. याचिकेच्या सुनावणी दारम्यान शिकारीतर्फे अॅड आदिल मिर्झा, याचिकाकर्त्ये यांच्याकडून अॅड श्रीरंग भांडारकर, तर वनविभागातर्फे अॅड कार्तिक शुकुल यांनी बाजू मांडली.
हेही वाचा - नागपूर; ब्रँडेड खाद्य तेलाच्या डब्यातून भेसळयुक्त तेलाची विक्री