ETV Bharat / state

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचा दावा खोटा, नागपुरातील कोरोना परिस्थिती भीषण - नागपुरातील कोरोना रुग्णालयांची स्थिती

केवळ शासकीयच नाही तर आता खासगी रुग्णालयात देखील नव्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी एकही खाट उपलब्ध नसल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत रुग्णसंख्या कमी कशी करता येईल यावर भर देण्याऐवजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिवसाची संचारबंदी उठवून केवळ रात्रीचा संचारबंदी सुरू ठेवल्याने बेजबाबदार जनतेला रान मोकळे झाले आहे.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Apr 2, 2021, 9:34 PM IST

Updated : Apr 3, 2021, 7:14 PM IST

नागपूर - गेल्या महिन्याभरापासून उपराजधानी नागपुरातील कोरोनाची परिस्थिती अतिशय भीषण झालेली आहे. रुग्णांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की, शासकीय आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ शासकीयच नाही तर आता खासगी रुग्णालयात देखील नव्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी एकही खाट उपलब्ध नसल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत रुग्णसंख्या कमी कशी करता येईल यावर भर देण्याऐवजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिवसाची संचारबंदी उठवून केवळ रात्रीचा संचारबंदी सुरू ठेवल्याने बेजबाबदार जनतेला रान मोकळे झाले आहे.

नागपुरातील कोरोना स्थिती

नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असतानादेखील पालकमंत्र्यांनी नागपूरची परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला होता, एकीकडे नव्या रुग्णांना खाट सुद्धा मिळत नसताना पालकमंत्र्यांनी परिस्थितीवर समाधान व्यक्त केले होते. शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयातील एकूण खाटा आणि उपलब्ध खाटांच्या परिस्थितीवर नजर टाकण्यापूर्वी पालकमंत्री काय म्हणाले होते ते बघूया..

मार्च महिना सुरू झाला तेव्हा नागपूर जिल्ह्यात केवळ ८ हजार रुग्ण होते, मात्र आजच्या दिवशी ही रुग्णसंख्या ४० हजारांच्या पुढे गेली आहे, त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची वणवण सुरू आहे, तर मात्र प्रशासनाला ही परिस्थिती का दिसत नाही हा खरा प्रश्न आहे म्हणून म्हणून गेल्या महिन्यातील आकडे मांडून आपण नागपुरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात असलेल्या एकूण खाटा आणि उपलब्ध खाट यांचा आढावा घेणार आहोत.

नागपूर शहरात एकूण उपलब्ध खाटांची संख्या

आजच्या घडीला नागपूर शहरात हजारो रुग्णालये अस्तित्वात आहेत, त्यापैकी काही मोठ्या रुगणालयांना कोरोनावरील उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी ५ मोठ्या रुग्णालयातील उपलब्ध खाटांचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासह महानगरपालिकेच्या रुग्णालयातील परिस्थिती देखील तपासणार आहोत. सर्वात आधी नागपुरातील दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात किती खाट रुग्णांसाठी आज उपलब्ध आहेत हे बघा.

मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालयात असलेल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेडिकल) मध्ये कोविड रुग्णांसाठी ५२५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्यापैकी केवळ १६ उपलब्ध आहेत. यामध्ये ३ अतिदक्षता आणि ३ व्हेंटिलेटर खाटांचा समावेश आहे. याशिवाय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेयो) मध्ये कोविड रुग्णांसाठी ५९० खाटा आहेत, पण मेयोमध्ये केवळ ४२ खाट उपलब्ध असून यापैकी ४ आयसीयू आणि ३ व्हेंटिलेटर खाटांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही रुग्णालयात अत्यवस्थ रुग्ण आणि गरोदर मातांसाठी हे खाट राखून ठेवण्यात आले आहेत. या शिवाय खासगी रुग्णालयापैकी ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये केवळ २ खाट तर सेंटर पॉईंट रुग्णालयामध्ये सुद्धा दोनच खाट उपलब्ध आहेत. या शिवाय गेट वेल, शुअर टेक, सेवन स्टार आणि अलेक्ससिस रुग्णालयांमध्ये एकही खाट नवीन रुग्णांसाठी उपलब्ध नाही. अशीच परिस्थिती संपूर्ण नागपुरातील ९० खासगी रुग्णालयात बघायला मिळत आहे. तरी देखील पालकमंत्री परिस्थिती सामान्य असल्याचा दावा करत आहेत.

फेब्रुवारीतील रुग्णसंख्या आणि मार्च महिन्यातील संख्या

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीचा नागपूर कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली होती. १ फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये दर दिवसाला सरासरी ५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू व्हायचा, मात्र मार्च महिन्यात मृत्यूचे आकडे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. मार्च महिन्यात सरासरी ५० रुग्णांचे मृत्यू होत आहेत. फेब्रुवारी महिन्यात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात १७१ लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर मार्च महिन्यात मृत्यूचा आकडा ७५७ वर गेलेला आहे. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात ५८६ लोकांचे मृत्यू अधिक झाले आहेत. केवळ मृत्यू संख्येच्या बाबतीत मार्च महिना घातक ठरलेला नाही तर रुग्णसंख्येमध्ये सुद्धा मार्चमध्ये प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी रोजी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ८२५३ इतके सक्रिय रुग्ण उपचार घेत असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे, तर ३१ मार्च रोजी हा आकडा ४० हजारांच्या घरात गेला आहे, याचाच अर्थ असा होतो की, मार्च महिन्यात तब्बल ३२ हजार वाढीव रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडल्याची भीषण परिस्थिती नागपूरमध्ये उद्भवली आहे. रोज कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी अजूनही कमी आल्यानेच सक्रिय रुग्णांची संख्या येत्या काही दिवसातच ५० हजारांपर्यंत जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Last Updated : Apr 3, 2021, 7:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.