ETV Bharat / state

नागपुरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे वाईन शॉप सील - वर्षा वाईन शॉप सील

नागपूरमध्ये लॉकडाऊन असतानाही वर्षा वाईन शॉपमध्ये दारू विक्री करण्यात आली. यावेळी कोरोना नियमांचेही उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे हे वाईन शॉप सील करण्यात आले आहे.

nagpur
नागपूर
author img

By

Published : May 23, 2021, 9:50 PM IST

नागपूर - नागपुरात कडक निर्बंध असतानाही दारू विक्री केल्याने वर्षा वाईन शॉपच्या संचालकाला पोलिसांनी कारवाईचा दणका दिला आहे. शनिवारी (22 मे) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास डीसीपी लोहित मतानी यांनी खुद्द वाईन शॉपमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी शासनाच्या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे दिसले. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग, मनपा आणि गणेशपेठ पोलिसांनी वर्षा वाईन शॉपवर कारवाई केली.

नागपूरमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने वर्षा वाईन शॉपवर कारवाई, कोरोना संपेपर्यंत राहणार सील?

पोलिसांच्या इशाऱ्याकडेही दुर्लक्ष

गणेशपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत वर्षा वाईन शॉप आहे. कोरोनामुळे मद्य विक्री करताना प्रशासनाने घालून दिलेल्या अटी नियमाचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या. यामुळे गणेशपेठ पोलिसांनी वाईन शॉपच्या संचालकाला कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांच्या इशाऱ्यालाही न जुमानत शनिवारी वर्षा वाईन शॉपच्या संचालकाने अटी नियमांचे उल्लंघन केले. हे खुद्द पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी पाहिले. यावेळी साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गणेशपेठ पोलिसांनी या संचालकावर कारवाई केली.

उडवा उडवीची उत्तर देणे भोवले

पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी सहकाऱ्यांसह वर्षा वाईन शॉपवर जाऊन संचालकाला विचारपूस केली. यावेळी संचालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली. यामुळे कायद्याचे उल्लंघन करून धाक नसल्याने अखेर उपायुक्तांनी कारवाईचा दणका दिला. यावेळी मनपाचे अधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.

अतिरिक्त वाईन बॉटल जप्त

त्यानंतर वाईन शॉपमधील स्टॉक मोजण्यात आला. यावेळी अतिरिक्त वाईन बॉटल जप्त करण्याची कारवाई उत्पादन शुल्क विभागाने केली. तर महानगरपालिकेने वाईन शॉप सील करण्याची कारवाई केली. गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांनी दिली.

कोरोना संपेपर्यंत राहणार वाईन शॉप सील?

वाईन शॉप चालकाकडून साथ प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे वाईन शॉप सील करण्यात आले. आता पुढील आदेश येईपर्यंत अथवा कोरोना असेपर्यंत दुकान सील असणार आहे, अशी माहिती डीसीपी लोहित मतानी यांनी ईटीव्ही भारतला दिली.

हेही वाचा - वांद्रे परिसरातून तब्बल 1 कोटी 18 लाखांचा चरस जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.