ETV Bharat / state

नाना पाटोलेंना पाठिंबा नाही; वंचित बहुजन आघाडीचे स्पष्टीकरण

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. दोन तीन दिवसात नागपूर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केला जाईल.

कुशल मेश्राम
author img

By

Published : Mar 13, 2019, 2:24 PM IST

नागपूर - लोकसभा निवडणुकसाठी नागपूर मतदारसंघातून नाना पाटोले निवडणूक लढणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती त्यांनी समाज माध्यमातून प्रसृत केली होती. पण, ही माहिती चुकीची असून, आपण पाठिंबा दिला नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव कुशल मेश्राम यांनी स्पष्ट केले आहे.

नाना पाटोले मतदारांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत, असे मेश्राम म्हणाले. नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. दोन तीन दिवसात नागपूर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केला जाईल. फक्त नागपूरमध्येच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाज वंचित बहुजन आघाडीला मतदान करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Intro:नागपूरातून वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस ला पाठिंबा असल्याची माहिती काँग्रेस चे लोकसभेचे उमेदवार नाना पाटोलें यांनी सोशिअल मीडिया च्या माध्यमातून दिली मात्र ही माहिती चुकीची असून वंचित बहुजन आघाडी ने नागपूर लोकसभा क्षेत्रात कुणालाच पाठींबा दिला नाही अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव कुशल मेश्राम यांनी दिलीय

Body:मतदारांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न नाना पाटोलें करीत आहेत असा आरोप देखील त्यांनी केलाय १५ मार्चला सर्व ४८ उमेदवारांची यादी जाहिर करण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिलीय.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.