ETV Bharat / state

नागपुरात पोलीस हवालदाराला चिरडण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

author img

By

Published : Feb 29, 2020, 10:46 AM IST

Updated : Feb 29, 2020, 11:23 AM IST

अवैध प्रवासी वाहतूक करताना कारवाई केल्याच्या रागातून एका व्हॅन चालकाने आपले वाहन पोलीस हवालदाराच्या अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न केला. व्हॅन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

ताब्यात व्हॅन
ताब्यात व्हॅन

नागपूर - येथील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील हवालदार सुभाष लांडे यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या अंगावर व्हॅन घालून आरोपीने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने ते थोडक्यात बचावले. त्यांच्या पायाला सहा टाके लागलेत. या प्रकरणी अरविंद मेटे याला अटक केली आहे.

पोलीस हवालदाराला चिरडण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अरविंद मेटे हा अवैध प्रवासी वाहतूक करत असल्याने दोन दिवसांपूर्वी सक्करदरा पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक करण्याच्या गुन्ह्याखाली अरविंद मेटेवर कारवाई केली होती. त्यावेळी संतापलेल्या आरोपीने हवालदार सुभाष लांडे यांना बघून घेण्याची धमकी दिली होती. लांडे यांनी केलेल्या कारवाईचा राग मनात धरून आरोपीने यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

सुदैवाने सुभाष लांडे या हल्ल्यात थोडक्यात बचावले असून त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. व्हॅनने चिरडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आरोपी अरविंद आपली गाडी जागेवर सोडून पळाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हेही वाचा - ..म्हणून नागपूर पोलिसांवर आली तिसरा डोळा उघडण्याची वेळ

Last Updated : Feb 29, 2020, 11:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.