ETV Bharat / state

Vadettiwar On Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा - विजय वडेट्टीवार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 7:28 PM IST

Vadettiwar On Maratha Reservation : लाठीचार्जच्या घटनेमुळं संपूर्ण मराठा समाज आक्रमक झालेला आहे (Maratha Reservation Issue). मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा प्रश्न निकाली काढण्याकरिता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन (Legislature special session) बोलवावे आणि मराठा समाजाला न्याय देण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. (Jalna Maratha protestors lathicharge)

Vadettiwar On Maratha Reservation
विजय वडेट्टीवार
मराठा आरक्षणावर विजय वडेट्टीवारांचे मत

नागपूर Vadettiwar On Maratha Reservation : राज्यकर्ते मराठा समाजाची निव्वळ दिशाभूल करत असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ज्यावेळी राज्याभर पाच ते दहा हजार लोकांचे मोर्चे निघाले होते, त्यावेळी केंद्र सरकार हे (Maratha Reservation Issue) आरक्षणाबद्दल निर्णय का घेऊ शकलं नाही. यांना केवळ आरक्षणाचा हा मुद्दा रेंगाळत ठेवून राजकारण करायचं होतं, (Legislature special session) असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. काल मराठा समाजाच्या लोकांवर झालेला लाठीचार्ज देखील राज्य सरकार पुरस्कृतचं होता, असा आरोपही त्यांनी केला आहे. (Jalna Maratha protestors lathicharge) नागपूर येथील रवी भवनच्या शासकीय बंगल्यात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Vadettiwar On Maratha Reservation)

लोकांवर जाणीवपूर्वक लाठीचार्ज : सरकार केवळ या विषयावर बनवाबनवीची व फिरवा फिरवीची भाषा करत आहे. कालच्या घटनेचे संपूर्ण व्हिडिओ पाहिले आहेत. त्यात ज्या मंडपात उपोषण सुरू होतं तिथे काय काय घडलं याचा व्हिडिओ मी बघितला असून मराठा समाजाच्या लोकांवर जाणीवपूर्वक लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

पोलिसांनी गमिनी कावा नीती का वापरली नाही : उपोषणकर्त्यांमध्ये व पोलिसांमध्ये समझोता झाला नव्हता. तर पोलिसांनी गनिमी कावा ही नीती का वापरली नाही. त्या ठिकाणी ५ हजार लोकांची गर्दी होती. त्याच वेळेस पोलीस का तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर महिलांनी स्वतःच्या संरक्षणासाठी तयार केलेले कठडे तोडण्यासाठी महिला पोलिसांना आदेश कुणी दिला, असे अनेक प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत.

घोषणा देतात लाठीचार्ज का सुरू केला : मराठा समाजाच्या तरुणांनी घोषणा देणं सुरू केलं. फक्त घोषणा सुरू केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला, असं तेथील अनेक तरुण सांगत आहेत. कशाला मारता, आम्हाला मारू नका, अशी विनंती तरुण करीत असताना पण बेजबाबदारीने वागणाऱ्या पोलिसांनी गृहखात्याच्या इशाऱ्यावर मराठा समाजाला बदडून काढलं, असं वडेट्टीवार म्हणाले.

गृहमंत्रालय काय करत आहे : हिंदू-मुस्लिम यांच्यात वाद आता चालत नाही. कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महायुतीचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये सात दंगली झाल्या. मागच्या महिन्यामध्ये चार दलितांवर हल्ले झाले. गृह खाते काय करत आहे, हा खरा प्रश्न राज्यातील जनतेला पडलेला आहे. वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. देशात अशी घटना कधीही घटना नाही. अमानुषपणे वारकऱ्यांना ठोकून काढायचं काम झालं आणि आजही आंदोलन चिरडण्यासाठी, संपवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला, असा आरोप वडेट्टीवारांनी केला.

म्हणून एवढा खटाटोप : सरकारच्या मनात भीती आहे. या आंदोलनाचं मोठं स्वरूप होईल आणि मग संभाळणे कठीण जाईल. आरक्षणाच्या विषयावर सरकारने खोटं बोलून मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आपलं बिंग फुटेल म्हणून एवढा मोठा खटाटोप केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

या मार्गाने आरक्षण देता येईल : मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा असेल तर यावर दोन मार्ग आहेत. वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकारने ज्या पद्धतीने ईडब्लूएसला आरक्षण देण्यात आलेलं आहे, त्याच पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण केंद्र सरकारने द्यावं. याशिवाय जर ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यायचं असेल तर सिलिंगची मर्यादा तुम्ही ठेवू नका. तसंही ५० टक्यांच्यावर आरक्षण गेलेलं आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा:

  1. Prithviraj Chavan On Lathicharge : आंदोलन दडपण्याचा आदेश मुंबईतूनच - पृथ्वीराज चव्हाण
  2. Lathicharge on Maratha Protester : मराठा आंदोलकांवर जालन्यात लाठीचार्ज; राज्यभरात मराठा समाज आक्रमक
  3. Lathicharge on Maratha Protester : आधी मोठे मोर्चे निघाले, पण आताच....? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.