नागपूर - गुरुवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यावेळी पावसासह जोरदार गारपीटही झाली आहे. एक आणि दोन जानेवारीला नागपुरात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.
हेही वाचा - 'राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालया'च्या' नव्या प्रशस्त इमारतीचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण
नागपुरात मागील तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. मात्र, आज पावसाचा जोर वाढला असून गारपीटही झाली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे गहू, मिरची, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फळ आणि पालेभाज्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.