ETV Bharat / state

Ramdas Athawale News : इंडिया आघाडी 'निगेटिव्ह', नरेंद्र मोदींसमोर टिकाव लागणं अशक्य - रामदास आठवले - राहुल गांधींवर टीका

आज नागपूरमध्ये विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. त्यांनी ही आघाडी चुकीची असल्याचं म्हटलंय. तसंच शरद पवारांनी देशहितासाठी एनडीएसोबत यायला हवं, असंही ते म्हणाले आहेत.

Ramdas Athawale News
रामदास आठवले
author img

By

Published : Aug 22, 2023, 1:02 PM IST

माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले

नागपूर : पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, यावरून इंडिया आघाडीमध्ये संघर्ष सुरू आहे. प्रत्येक पक्षाचे नेते पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहेत. पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मजबूत आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी 2024 मध्ये आम्ही 350 पेक्षा जास्त जागा जिंकू, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. कांद्याला चांगला भाव मिळावा, ही अनेक दिवसांची मागणी आहे. 'महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकतो कांदा आणि महाविकास आघाडीचा झाला वांदा' या शब्दांत सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलीय. राहुल गांधींच्या नादाला शरद पवारांनी लागू नये, असं देखील ते म्हणाले आहे.

शिर्डीतून निवडणूक लढण्यास इच्छुक : आरपीआयला २ जागा महायुतीमध्ये मिळाल्या आणि त्या निवडून आल्या तर आम्हाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळेल. शिर्डीमधील लोकांची इच्छा आहे, की मला त्या ठिकाणी संधी मिळावी. माझीसुद्धा शिर्डीमधून उमेदवारी मिळावी, अशी इच्छा आहे. इंडिया आघाडी 'निगेटिव्ह' आघाडी आहे. राहुल गांधींनी ओढून ताणून हे नाव ठेवले आहे, असे नाव ठेवणे योग्य नाही. ही आघाडी चुकीच्या पद्धतीनं झालेली आहे. नरेंद्र मोदींसमोर टिकाव लागणं अशक्य आहे. इंडिया आघाडीमध्ये केजरीवाल जातील की नाही, हे सांगता येत नाही. जनता आमच्या सोबत आहे असं ते म्हणाले.

शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं : शरद पवारांना एनडीएमध्ये येण्याचे आवाहन केले होते. याआधी पवारांनी भाजपाला समर्थन दिलं आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, हे भाजपाने स्पष्ट केलं आहे. अजित पवार गटाने ठाणे रुग्णालयावरून एकमेकांवर कुरघोडी करू नये. तसेच शरद पवार यांनी देशहितासाठी एनडीएसोबत यायला हवं. मी देखील काँग्रेस, एनसीपीसोबत राहून पुन्हा एनडीएमध्ये आलेलो आहे. राजकारणात कॉमन मिनिमन अजेंड्यावर एकत्र यायला पाहिजे, असं आठवले म्हणाले.

हेही वाचा :

  1. Ramdas Athawale : 'तुम्ही कधीही आमच्यासोबत येऊ शकता', आठवलेंची नितीश कुमारांना थेट ऑफर
  2. Ramdas Athawale : दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव; अन्याय, अत्याचाराच्या विरोधात दलित पँथरचा लढा - रामदास आठवले
  3. Ramdas Athawale On Thackeray : ठाकरेंनी फडणवीसांच्या मांडीला मांडी लावली असती तर, आमदार फुटले नसते - रामदास आठवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.