नागपूर - केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज सीएनजी बस मधून प्रवास केला. शहरात डिजलवर धावणाऱ्या सिटी बसेसला सीएनजी मध्ये रूपांतरीत करण्याचे काम सुरू आहे. त्यापैकीच एका बसमधून नितिन गडकरी यांनी शहरातील यशोधरा नगर ते सीए रोड या मार्गावर फेरफटका मारला.
हेही वाचा - लोकांचे जीव वाचावण्यासाठी नवा मोटार वाहन कायदा, सरकारी तिजोरी भरण्याचा उद्देश नाही - गडकरी
सीएनजी गाड्यांमुळे नागपूर शहरात पर्यावरणपुरक दळणवळणाला चालना मिळणार असल्याचे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले. सीएनजी पंप काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले. हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल त्यांनी नागपूर महापालिकेचे कौतुकही केले. नागपूर राज्यातील प्रदूषित शहरांच्या यादीत अव्वल स्थान मिळवण्याच्या मार्गावर होते. यावर उपाय म्हणून नागपूर शहरात यशोधरा नगर येथे सीएनजी पंप सुरू करण्यात आला आहे. नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून याकडे पाहिले जात होते.