नागपूर - जिल्ह्यातील खापरी येथील स्वामी विवेकानंद मिशन रूग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या ऑक्सिजन प्लांटची क्षमता 75 जम्बो सिलेंडर प्रति दिवस इतकी आहे. एन.के. गर्ग फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक भावनेतून रुग्णांसाठी हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहे. यामुळे गोर गरीब रुग्णांना सेवा देणाऱ्या स्वामी विवेकानंद मिशन रूग्णालयाची ऑक्सिजनची गरज भागवण्यास मदत झाल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
मदत करणाऱ्यांचे मानले आभार
कोरोनाच्या दोन्ही लाटेत अनेक संकट आव्हाने आले. एक वेळ अशी आली की ब्लॅक फंगसचे इंजेक्शन मिळणे कठिण झाले. त्यावेळीही विदर्भात एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन निर्माण प्लांन्ट उभारण्यासाठी प्रयत्न केले. आज केवळ नागपूर विदर्भातच नाही तर महाराष्ट्र, देशभरात इंजेक्शनचा पुरवठा या कंपनीतून होत आहे. तसेच विदर्भात सिकलसेलच्या इंजेक्शन निर्मितीसाठीसाठी औषध बनवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असल्याचे गडकरी म्हणाले. मेळघाट गडचिरोली विदर्भातील आणि दुर्गम भागात सुद्धा व्हेंटिलेटर आणि इतर अत्यावश्यक सेवा पोहोचवण्याचे काम या काळात झाले. त्या संकट काळात सामाजिक दायित्व यातून जे लोक समाजाच्या मदतीसाठी पुढे आले त्या सर्वांचा मी आभारी आहे, असेही गडकरी म्हणाले.
'लोकसहभाग यापुढेही कायम ठेवा'
कोरोनाच्या काळात शंभर कोटीच्या घरात साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, व्हेंटिलेटरवर याचा समावेश आहे. या काळात अनेक जण सामाजिक दायित्वातून मदतीचा हात दिला. यामाध्यमातून आरोग्य सेवा उभारण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली. यामुळे या संकटातून बाहेर पडता आले. स्वामी विवेकानंद मिशन हे रुग्णालयात ऑक्सिजन सेवा उपलब्ध झाल्याने गोरगरिब रुग्णांना उपचारासाठी मदत होणार आहे. तसेच येत्या काळात या रुग्णालयाचा डोलारा वाढावा आणि रुग्णालय 500 बेडचे व्हावे. यासाठी आतापर्यंत ज्यापद्धतीने नागरिकांनी मदतीचा हात देऊन हा दवाखाना उभा केला आहे, पुढेही या रुग्णालयाला मदत मिळावी, असे आवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
हेही वाचा -नाशकात रस्त्यावर फेकलेली आढळली कोरोना लस; प्रशासनाचे तोंडावर बोट