ETV Bharat / state

गडकरी सरांचा स्पेशल क्लास,कार्यकर्त्यांचे टोचले कान - Party workers

सत्ता आली म्हणून कोणाच्या ही अंगात येऊ नये. सत्ता येताच अनेक नेत्यांच्या अंगात येते.  ते "साला मै तो साहेब बन गया, साहेब बन के कैसा तन गया" अशा तोऱ्यात वावरतात. मात्र, लक्षात ठेवा हे सर्व तात्पुरत असते. गडकरी एवढ्यावरच थांबले नाही तर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षाच्या जुन्या दिवसांची आठवण करून देत म्हणाले की जेव्हा आपण विरोधी पक्षात असतो, अडचणीच्या काळात असतो, तेव्हा आपल्याला कोणी विचारत नाही.

गडकरी सरांचा स्पेशल क्लास,कार्यकर्त्यांचे टोचले कान
author img

By

Published : Jul 7, 2019, 3:35 AM IST

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज भाजपच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांचे कान टोचले. नागपुरात भाजपच्या सदस्यता मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांची चांगलाच क्लास घेतला. एवढच नाही तर कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

गडकरी सरांचा स्पेशल क्लास,कार्यकर्त्यांचे टोचले कान

सत्ता आली म्हणून कोणाच्या ही अंगात येऊ नये. सत्ता येताच अनेक नेत्यांच्या अंगात येते. ते "साला मै तो साहेब बन गया, साहेब बन के कैसा तन गया" अशा तोऱ्यात वावरतात. मात्र, लक्षात ठेवा हे सर्व तात्पुरत असते. गडकरी एवढ्यावरच थांबले नाही तर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षाच्या जुन्या दिवसांची आठवण करून देत म्हणाले की जेव्हा आपण विरोधी पक्षात असतो, अडचणीच्या काळात असतो, तेव्हा आपल्याला कोणी विचारत नाही. सत्ता आपल्यापासून दूर असते तरी आपल्याबरोबरचा कार्यकर्ता आपल्यासोबत हिमतीने काम करतो. खऱ्या नेतृत्वाचे हेच लक्षण असल्याचे गडकरी म्हणाले. आपल्या भाषणाच्या उत्तरार्धात गडकरी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ही दम दिला.

गडकरी म्हणाले लोकसभा निवडणुकीत जे कार्यकर्ते काम करण्यात मागे राहिले, आता त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याकडील एका गायीच्या उपचाराची कहाणी सांगत गडकरी म्हणाले काही कार्यकर्त्यांना ही शक्तिशाली प्रोटिन्सचे इंजेक्शन देण्याची गरज आहे. कामाच्या बाबतीत सध्या काही कार्यकर्ते कुपोषित वाटतात. त्यांची तब्येत जरी ठीक असली तरी त्यांच्या अंगात रक्त नाही. त्यांना कोणते व्हिटॅमिन पाहिजे ते ओळखा आणि कामाला लावा. मात्र, प्रोटिन्स एवढे ही देऊ नका की त्यांना हगवण लागेल असा सल्ला ही गडकरी यांनी दिला. विधानसभेची निवडणूक आहे, त्यामुळे आपले कार्यकर्ते शक्तिमान पाहिजेत. आपले मताधिक्य कायम राहिले पाहिजे अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली. ज्यांनी आपल्याला मतदान केलेलं नाही अशा लोकांचा ही विश्वास संपादन करण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Intro:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज भाजपच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांनचे कान टोचले आहे...नागपुरात भाजपच्या सदस्यता मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांची चांगलीच क्लास घेतला एवढच नाही तर कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत..Body:सत्ता आली म्हणून कोणाच्या ही अंगात येऊ नये.. सत्ता येताच अनेक नेत्यांच्या अंगात येते..  ते "साला मै तो साहेब बन गया, साहेब बन के कैसा तन गया" अशा तोऱ्यात वावरतात... मात्र लक्षात ठेवा हे सर्व तात्पुरत असते.... गडकरी एवढ्यावरच थांबले नाही तर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षाच्या जुन्या दिवसांची आठवण करून गडकरी म्हणाले की जेव्हा आपण विरोधी पक्षात असतो, अडचणीच्या काळात असतो तेव्हा आपल्याला कोणी विचारत नाही... सत्ता आपल्यापासून दूर असते तरी आपल्याबरोबरचा कार्यकर्ता हिमतीने आपल्यासोबत काम करतो, आणि खऱ्या नेतृत्वाचे हेच लक्षण असल्याचे गडकरी म्हणाले... आपल्या भाषणाच्या उत्तरार्धात गडकरी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ही दम दिला... गडकरी म्हणाले लोकसभा निवडणुकीत जे कार्यकर्ते काम करण्यात मागे राहिले... आता त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे... आपल्याकडील एका गायीच्या उपचाराची कहाणी सांगत गडकरी म्हणाले काही कार्यकर्त्यांना ही शक्तिशाली प्रोटिन्सचे इंजेक्शन देण्याची गरज आहे, कामाच्या बाबतीत सध्या काही कार्यकर्ते कुपोषित वाटतात, त्यांची तब्येत जरी ठीक असली तरी त्यांच्या अंगात रक्त नाही, त्यांना कोणतं व्हिटॅमिन पाहिजे ते ओळखा आणि कामाला लावा.. मात्र, प्रोटिन्स एवढे ही देऊ नका की त्यांना हगवण लागेल असा सल्ला ही गडकरी यांनी दिला...  विधानसभाईची निवडणूक आहे त्यामुळे आपले कार्यकर्ते शक्तिमान पाहिजे... आपले मताधिक्य कायम राहिले पाहिजे अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली...ज्यांनी आपल्याला मतदान केलेलं नाही अशा लोकांचे ही विश्वास संपादन करण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला... 

बाईट -- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.