नागपूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौरा निमित्त भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. आगामी काळात लोकसभा, विधानसभा, नागपूर महानगर पालिका निवडणूका होऊ घातलेल्या आहेत. त्यादृष्टीने अमित शहा यांचा हा दोन दिवसीय दौरा महत्वाचा मानला जात आहे. मध्यंतरी पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला आहे. मात्र, अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्ते पुन्हा कामाला लागतील अशी अपेक्षा भाजपच्या नेत्यांना आहे.
असा आहे नागपूर दौरा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आज संध्याकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर रात्री पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. शनिवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट देऊन आदरांजली अर्पण करणार केल्यानंतर रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृति मंदिराला भेट देतील. त्यानंतर कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते पुण्याला जाणार आहेत.
भव्य स्वागत होणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नागपुरात दाखल होताच त्यांचे विमानतळावर भारतीय जनता पक्षाकडून जोरदार स्वागत केले जाणार आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शहरातील सर्वच आमदार, पदाधिकारी तसेचं हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
सरसंघचालक बरेली दौऱ्यावर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉ. मोहन भागवत 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान उत्तरप्रदेशच्या बरेली दौऱ्यावर आहेत. संघप्रमुख आज रात्री बरेलीला जातील. सरसंघचालक मोहन भागवत ब्रज प्रांताच्या प्रचारकांचीही बैठक घेणार आहेत. प्रांतप्रमुख, क्षेत्रप्रमुख, क्षेत्रप्रमुख, प्रांत प्रचारक या बैठकीत उपस्थित राहतील. त्यानंतर 19 फेब्रुवारीला ते रुहिलखंड विद्यापीठातील स्वयंसेवकांच्या कुटुंबाचीही भेट घेणार आहेत. ते कुटूंब प्रबोधन कुटुंब संवाद कार्यक्रमालक संबोधित करतील. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी ते बरेलीहून सीतापूरमार्गे लखनऊला जातील.
हेही वाचा - Jitendra Awhad: सहाय्यक आयुक्त मारहाण प्रकरण! जितेंद्र आव्हाड समर्थकांना अटक